
भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमिअर लीगच्या चौदाव्या हंगामातील दुसऱ्या टप्प्याला येत्या 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स संघाशी भिडणार आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंच्या नावावर विविध विक्रमांची नोंद आहे. मात्र, आयपीएलमध्ये जलद शतक ठोकण्याची यादीत केवळ एकाच भारतीय खेळाडूचे नाव आहे. तर, द युनिव्हर्सल बॉस क्रिस गेलच्या नावावर सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम आहे. जाणून घेऊया आयपीएलमधील जलद शतक ठोकणाऱ्या खेळाडूंची यादी.
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याच्या यादीत क्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर युसूफ पठाण दुसऱ्या, डेव्हिड मिलर तिसऱ्या, अॅडम गिलक्रिस्ट चौथ्या, ए बी डिव्हिलियर्स पाचव्या स्थानावर आहे. हे देखील वाचा- IPL 2021: पंजाब किंग्सने दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज अॅडेम मार्करामला दिली संधी, आयपीएल 14 च्या दुसऱ्या सत्रात डेव्हिड मलानची घेणार जागा
आयपीएलमध्ये वेगवान शतक करणाऱ्या खेळाडूंची यादी-
क्रिस गेल-
तडाखेबाज फलंदाज क्रिस गेलने 2013 साली पुणे वॉरियर्सविरोधात आक्रमक फलंदाजी केली होती. या सामन्यात त्याने केवळ 30 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. तर, या सामन्यात त्याने 64 चेंडून एकूण 175 धावा ठोकल्या होत्या.
यूसुफ पठान-
सर्वात जलद शतक ठोकण्याच्या यादीत युसूफ पठाण ऐकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध 37 चेंडूत शतक ठोकले होते. त्यावेळी राजस्थान संघाचा कर्णधार शेन वॉर्नने त्याच्या खेळीचे कौतूक केले होते.
डेविड मिलर-
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वार्नरने आरसीबी विरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली होती. या सामन्यात त्याने 38 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. तसेच या सामन्यातील आठराव्या षटकात षटकार ठोकून त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला विजय मिळवून दिला होता.
अॅडम गिलख्रिस्ट-
ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने आयपीएलच्या पहिल्याच सत्रात डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या 42 चेंडूत शतक ठोकले होते.
एबी डिव्हिलियर्स-
आरसीबीचा धोकादायक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध 43 चेंडूत शतक झळकावले. यादरम्यान त्याने 12 षटकारही लगावले.
आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी 7 दिवस शिल्लक आहेत. यासाठी संघांनी तयारीही सुरू केली आहे. हंगामातील उर्वरित 31 सामने 27 दिवसांच्या दरम्यान खेळले जातील जे दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे होणार आहेत. अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी दुबईत खेळला जाईल.