IPL 2021: ऑस्ट्रेलियाच्या टी-20 वर्ल्ड कप संघातील सरप्राईज एंट्री Nathan Ellis आयपीएल गाजवण्यास सज्ज, 3 संघ होते मागावर
नॅथन एलिस (Photo Credit: Twitter/ICC)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 हंगाम पुन्हा सुरु होण्यास फक्त एक महिना शिल्लक आहे आणि आठ फ्रँचायझी लवकरच त्यांचे संघ निश्चित करण्याच्या तयारीत आहेत. परदेशी खेळाडूंची उपलब्धता ही समस्या कायम असताना, अज्ञात फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियन (Australia) वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला (Nathan Ellis) 14 व्या हंगामासाठी संघात स्थान दिले आहे. Cricket.com.au नुसार, यंदाच्या आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या टप्प्यासाठी एलिसच्या मागावर एकूण तीन फ्रँचायझी होते आणि गुरुवारी रात्री त्याने त्यापैकी एकाशी करार केला आहे. फ्रँचायझीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) लवकरच संघासोबत खेळाडूंचा संबंध निश्चित करणे अपेक्षित आहे. (BAN vs AUS 2021: ऑस्ट्रेलियाच्या Nathan Ellis याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार एंट्री, बांगलादेशविरुद्ध टी-20 पदार्पणात घेतली हॅट्रिक)

नवीन हंगाम सुरू होण्याआधी लिलावादरम्यान एलिसवर 8 पैकी कोणत्याही आयपीएल फ्रँचायझींने बोली लावण्यात रस दाखवला नाही, परंतु बांगलादेश मालिकेनंतर त्याने फ्रँचायझींच्या रडारवर होता. 26 वर्षीय वेगवान गोलंदाजाने ढाका येथे बांगला टायगर्सविरुद्ध पदार्पण करताना हॅटट्रिक घेण्याचा मोठा पराक्रम केला होता आणि आगामी ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या 3 जणांच्या राखीव यादीमध्ये स्थान दिले होते. आणि आता एलिसला जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीगमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. दरम्यान, या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाकडे आपली चमक दाखवण्यासाठी अर्धा-हंगाम आहे आणि यूएईमध्ये चांगली कामगिरी केल्यास त्याला आयपीएल 2022 मेगा-लिलावात मोठी डील मिळू शकते.

दुसरीकडे, आयपीएल फ्रँचायझींना त्यांच्या संघांत खेळाडूंना निश्चित करण्यासाठी 20 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती परंतु काही परदेशी खेळाडूंची उपलब्धता अजूनही एक समस्या बनली आहे. एलिस हा एकमेव बदली खेळाडू नाही जो आयपीएल फ्रँचायझीमध्ये उर्वरित हंगामात सामील होईल. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला अनेक खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. डेविड वॉर्नर, जोश हेजलवूड, ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ हे सर्व आपापल्या संघासाठी उपलब्ध आहेत, तर पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, झे रिचर्डसन आणि रिले मेरिडिथ सारखे काही जण या स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.