नॅथन एलिस टी-20 डेब्यू हॅट्ट्रिक (Photo Credit: Twitter/ICC)

BAN vs AUS 2021: बांग्लादेश (Bangladesh) आणि ऑस्ट्रेलिया (Australi) यांच्या पाच टी -20 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामना नुकताच पार पडला. ढाका (Dhaka) येथे खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नवीन खेळाडूला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. कांगारू संघासाठी या सामन्यात, 26 वर्षीय वेगवान गोलंदाज नॅथन एलिसने (Nathan Ellis T20 Debut) पदार्पण केले आणि त्याने पदार्पणातच धमाकेदार कामगिरी केली. त्याने पहिल्याच सामन्यात हॅटट्रिक घेतली. या सामन्यात एलिसने हॅट्रिक (Nathan Ellis Hat-trick) विकेट घेतली, तर बांगलादेश संघाने कांगारूविरुद्ध पहिल्या डावात 20 षटकांत 9 बाद 127 धावा केल्या. एलिसने (Nathan Ellis) बांग्लादेशच्या महमुदुल्लाह, मुस्तफिजुर रहमान, मेहदी हसन यांना पॅव्हिलियनमध्ये धाडलं.

नॅथन एलिस मूळचे ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्सचा आहेत आणि बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स संघाकडून खेळतो. बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या टी -20 सामन्यात यजमानांना चकित करण्याच्या हेतूने नॅथन एलिसला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशी संघाने 19 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 122 धावांचा पल्ला गाठला. शेवटच्या ओव्हरमध्ये बांगलादेशला कर्णधार महमूदुल्लाकडून आशा होती, ज्याने अर्धशतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाचा प्रभारी कर्णधार मॅथ्यू वेडने शेवटच्या ओव्हरची जबाबदारी एलिसकडे दिली. एलिसने शेवटच्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंमध्ये पाच धावा लुटल्या पण नंतर शेवटच्या तीन चेंडूंमध्ये विकेट्स घेत शानदार हॅट्ट्रिक घेतली आणि नवा इतिहास रचला. एलिस टी-20 डेब्यू सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

त्याने चौथ्या चेंडूवर महमुदुल्लाह (52), पाचव्या चेंडूवर मुस्तफिजुर रहमान (0) आणि शेवटच्या चेंडूवर मेहदी हसन (6) यांना बाद करत पदार्पणात हॅट्ट्रिक घेतली. एलिसने 4 ओव्हरमध्ये 34 धावा देऊन 3 गाडी बाद केले. दुसरीकडे, एलिसच्या हॅट्ट्रिकनंतर मिचेल मार्शने 51 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यास ती पुरेशी ठरली नाही. बांग्लादेशच्या 127 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया 4 विकेट्स गमावून 117 धावाच करू शकला. परिणामी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत बांग्लादेशने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.