IPL 2021 Auction: आयपीएल लिलावात ‘या’ स्टार खेळाडूंना खरेदीदार मिळणे कठीण, होऊ शकतात 14व्या सीजनमधून आऊट!
शेल्डन कॉटरेल आणि केदार जाधव (Photo Credit: Instagram)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 14व्या हंगामासाठी सर्व आठ फ्रँचायझी संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही बड्या खेळाडूंना फ्रँचायझींनी बाहेरचा रस्ता दाखवला आणि आता या खेळाडूंना लिलावाच्या प्रक्रियेतून मार्ग काढावा लागेल. बरेच संघ भविष्याच्या दृष्टीने संघ बांधणी करण्याचा विचार करीत असताना काही दिग्गजांना खरेदीदार मिळणे कठीण दिसत आहे ज्यामुळे यंदाच्या हंगामातून त्यांना बाहेर बसावे लागू शकते. स्टिव्ह स्मिथ, केदार जाधव (Kedar Jadhav), ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान यांच्यासारख्या प्रभावी टी-20 खेळाडूंना फ्रँचायझींनी फेब्रुवारी महिन्यात आयोजित होणाऱ्या मिनी-लिलावापूर्वी बाहेर केलं. परंतु, असे बरेच खेळाडू असू शकतात ज्यांना खरेदीदार मिळेल. अशाच पाच खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (IPL 2021 Auction Date: आयपीएल 2021 च्या हंगामासाठी कधी होणार खेळाडूंचा लिलाव?)

1. केदार जाधव: चेन्नई सुपर किंग्जच्या 'डॅडीज आर्मी'चा महत्वपूर्ण भाग असलेल्या केदारला रिटेंशनच्या वेळी रिलीज करण्यात आलं. जाधव नियमितपणे खेळत नसल्यामुळे एखादा खरेदीदार मिल्ने कठीण दिसत आहे. शिवाय, केदारचे वय एक मोठा घटक सिद्ध होऊ शकते. बहुतेक संघ भविष्यासाठी संघ तयार करण्याचा विचार करीत असताना अष्टपैलू खेळाडू त्यांच्या विषलिस्ट यादीमध्ये असण्याची शक्यता कमीच आहे.

2. शेल्डन कॉटरेल: आयपीएल जगातील सर्वात कठीण लीग आहे ज्या फारच कमी जणांना यश मिळते. कॉटरेल पंजाबच्या मागील हंगामात अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही परिणामी त्याला रिलीज करण्यात आलं. तो वेगवान गोलंदाज आहे, पण अतिरिक्त धावा करण्यासाठी फलंदाज वेगाचा उपयोग करतात ज्यामुळे त्याचा वेग बॅकफायर करतो.

3. मोईन अली: आरसीबीने त्याला रिलीज केल्यानंतर अलीला खरेदीदार मिल्ने कठीण दिसत आहे. तो सुसंगत राहिला नाही आणि हीच त्याची सर्वात मोठी कमतरता आहे. आयपीएलमधील आजपर्यंतच्या मर्यादित रेकॉर्डमुळे अलीला या हंगामात प्रभावी बोली आकर्षित करण्यासाठी संघर्ष करावा लागेल.

4. नॅथन कोल्टर-नाईल: ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाला मागील लिलावात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने 8 कोटी रुपयांत विकत घेतले, पण त्याला अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. शिवाय, खेळाडूच्या दुखापतींचा इतिहासही खूप मोठा आहे ज्यामुळे लिलावात त्याच्या विरुद्ध जाऊ शकतो. 2018 मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने खरेदी केले पण तो दुखापतीमुळे बाहेर पडला.

5. जिमी नीशम: न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू 2019 आयसीसी वर्ल्ड कप फायनलमध्ये स्टार कामगिरी करणारा खेळाडू होता, मात्र दुर्दैवाने तो आपल्या फॉर्मची आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हनसाठी पुनरावृत्ती करू शकला नाही. लीगमध्ये तो फक्त पाच सामने खेळला, जिथे तो केवळ 19 धावा करू शकला. या सामन्यात त्याने केवळ दोन विकेट मिळवल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अवघ्या एक वर्षानंतर युवा काइल जेमीसन नीशमच्या तुलनेत उंचावला आहे आणि फ्रॅंचायझीज या कीवी अष्टपैलूवर आपले लक्ष केंद्रित करत असतील.