आकाश चोपडा (Photo Credit: Instagram)

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोपडाने (Aakash Chopra) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये झालेल्या 29 सामन्यात सर्वाधिक प्रभावित झालेल्या सहा अनकॅप्ड भारतीय खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. उर्वरित टूर्नामेंट उपलब्ध विंडो पाहून आयोजित केली जाईल पण सध्या भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे बीसीसीआयने मागील आठवड्यात स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. चोपडा यांनी सर्वप्रथम आवेश खानचा (Avesh Khan) उल्लेख केला ज्याची नुकतीच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय कसोटी संघासाठी बॅकअप खेळाडू म्हणून निवड झाली आहे. चोपडा यांनी सांगितले की दिल्ली कॅपिटल्सचे परदेशी गोलंदाज एनरिच नॉर्टजेच्या अनुपस्थितीत खानने संघासाठी विकेट घेण्याची जाबाबदारी स्वत:वर घेतली. (IPL 2021 मध्ये CSK च्या या गोलंदाजाची झाली सर्वाधिक धुलाई, रन लुटवणारा ठरला नंबर-1 गोलंदाज, यादीत भारतीयांचा दबदबा)

दुसर्‍या क्रमांकावर त्यांनी हर्षल पटेलचा समावेश केला ज्याने स्पर्धा स्थगि होई पर्यंत सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या होत्या तर तिसऱ्या स्थानावर त्यांनी देवदत्त पडिक्क्लचा, आणखी एका रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या खेळाडूचा समावेश केला. यंदाच्या हंगामात पडिक्क्लने पहिले आयपीएल शतक झळकावले होते. चोपडा म्हणाले की लीगमध्ये बऱ्याच अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी शतके ठोकली आहे असे नाही, कर्नाटकच्या युवा फलंदाजासाठी ही चांगली बाब आहे. आरसीबीविरुद्धसामन्यात सर्वांना प्रभावित केलेल्या पंजाब किंग्सच्या हरप्रीत ब्रारचा देखील चोपडा यांनी यादीत समावेश केला. पंजाबी स्टार गोलंदाजाने आरसीबीच्या एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला होता. पुढील स्थानासाठी त्याने रवि बिश्नोईला निवडले. त्याने सर्व सामने खेळले नाहीत पण मिळालेल्या सामन्यात त्याने नक्कीच प्रभाव पडला आहे.

शेवटच्या आणि अखेरच्या स्थानासाठी चोपडा त्यांनी राजस्थान रॉयल्सचा युवा डावखुरा फिरकीपटू चेतन सकारियाची निवड केली आहे. त्याने बरीच चांगली गोलंदाजी केली आणि पदार्पण मोसमात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने सात सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत.

आकाश चोपडा यांचे 6 अनकॅप्ड खेळाडू: अवेश खान (दिल्ली), हर्षल पटेल (आरसीबी), देवदत्त पडिक्क्ल (आरसीबी), हरप्रीत ब्रार (पंजाब), रवि बिश्नोई (पंजाब), चेतन सकारीया (राजस्थान).