इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सीजनच्या आयोजनावर अजूनही संभ्रम कायम असताना स्पर्धा शक्य असल्यास एकट्या मुंबई (Mumbai) शहरात सर्व सामन्यांचे आयोजन केले जाईल असे वृत्त समोर आले आहे. लीगच्या प्रमुख भागीदाराने ऑक्टोबरमध्ये एक शहर स्पर्धेची कल्पना आणली, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले. यंदा आयपीएलची (IPL) सुरुवात 29 मार्च रोजी होणार होती पण कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) अनिश्चित काळासाठी स्थगित केले. तथापि, यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) भवितव्याबद्दल उत्सुकतेने लक्ष लावून असणारे भारतीय बोर्ड वर्षाच्या शेवटी सुरक्षित विंडोच्या शोधात आहेत. आयसीसीने अद्याप या स्पर्धेचे भविष्य जाहीर केले नाही मात्र, जर ते पुढे ढकलले गेले तर बीसीसीआय त्या विंडोचा वापर करून आयपीएलचे आयोजन करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयच्या सर्व शक्यतांमध्ये, केवळ मुंबई-आयपीएलची कल्पना तयार केली जात आहे. (मेलबर्न कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने ICC टी-20 वर्ल्ड कप रद्द होण्याची शक्यता, आयपीएल 13 साठी उघडणार विंडो)
आयपीएल भारतात झाल्यास आणि ऑक्टोबरपर्यंत मुंबईत परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास मुंबईत चार उच्च-स्तरीय मैदान उपलब्ध आहेत जेथे सामने खेळले जाऊ शकतात. बीसीसीआय, ब्रॉडकास्टर्सचे(स्टार स्पोर्ट्स) रसदशास्त्र, बायो-बबल राखण्यासाठी प्रत्येक गोष्ट सुरळीतपणे पार पाडता येईल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने PTIला सांगितले. वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय वाय पाटील (नवी मुंबई) अशी तीन मैदाने मुंबईत आहेत. घणसोली येथे रिलायन्स मैदान आहे. या स्टेडियममध्ये आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे प्री-हंगाम शिबिर आयोजित केले जाते.
“अर्थात सर्व काही मुंबईतील कोविड परिस्थितीवर अवलंबून आहे. परंतु जर तेथे प्रेक्षकांना परवानगी नसेल आणि बायो-बबल तयार केला गेला तर मुंबई हा एक वाईट पर्याय ठरणार नाही,” अधिकाऱ्याने म्हटले. दरम्यान, आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप विषयी निर्णय घेतल्यानंतरच आयपीएलच्या आयोजनाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, सध्या मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त मुंबई शहरात सर्वाधिक आहेत.