इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020ची 19 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. आयपीएल (IPL) 2020 सुरू होण्यास अजून एक महिना शिल्लक असताना सर्व फ्रॅन्चायझी आणि खेळाडूंनी तयारी सुरु केली आहे. जवळपास सर्व संघांनी खेळाडूंसाठी कॅम्प आयोजित करून सराव सुरू केला आहे. या दरम्यान चार-वेळा आयपीएल चॅम्पिअन मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) प्रशिक्षण शिबिरही सुरू झाले असून खेळाडू येथे एक-एक करून पोहोचत आहेत. मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये पोहोचलेल्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे आणि नेटमध्ये मेहनत घेत आहेत. खेळाडूंच्या सरावचे व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले जात आहेत. अलीकडेच मुंबई इंडियन्सने आपल्या स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Rohit Sharma Hits The Nets: 'प्रतीक्षा Ro-over'! 195 दिवसानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची नेट्समध्ये दमदार फटकेबाजी, पाहा व्हिडिओ)
मुंबई फ्रॅन्चायझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुमराह फलंदाजांना त्रास देण्यासाठी यॉर्करचा कसून सराव करताना दिसत आहे. बुमराह या क्षणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे आणि महत्त्वाच्या प्रसंगी त्याने प्रत्येक वेळी मुंबई इंडियन्सला मदत केली आहे. विकेट घेण्याची क्षमता किंवा विकेटशिवाय चांगली गोलंदाजीची क्षमता बुमराहकडे आहे. पाहा बुमराहच्या यॉर्कर गोलंदाजीचा व्हिडिओ:
View this post on Instagram
गेल्या काही महिन्यांत त्याला अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले असले तरी तो मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिली पसंती असेल. बुमराहने आयपीएलमध्ये आतापर्यंत 77 सामन्यात7.55 च्या इकॉनॉमीने 82 गडी बाद केले आहे. यंदा मुंबई इंडियन्सचा पाचव्या जेतेपदावर निशाणा असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स 4 वेळा आयपीएलचे जेतेपद मिळविणारा एकमेव संघ आहे. मुंबई 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये चॅम्पियन बनली. यंदा आयपीएलचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी होईल असे मानले जात आहे.