पंच अनिल चौधरीसह राशिद खान (Photo Credits: Twitter)

IPL 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 47 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) दिल्ली कॅपिटलविरुद्ध (Delhi Capitals) जोरदार विजय मिळविला, पण सामन्यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे चाहते आणि तज्ञांमध्ये एक प्रकारचा वाद निर्माण झाला. ऑन-फील्ड अधिका-यांनी अनेक शंकास्पद निर्णय घेतल्याने आयपीएल (IPL) 13 मध्ये अंपायर्स कॉल आता चर्चेचा मुद्दा बनला आहे. दुबईतील एसआरएच (SRH) आणि डीसी (RDC) यांच्यात झालेल्या सामन्यात ऑफ-फिल्ड अंपायर अनिल चौधरी (Anil Chaudhary) यांनी सनरायझर्सचा कर्णधार डेविड वॉर्नरला (David Warner) एक प्रकारची मदत केली चर्चा सध्या सुरु झाली आहे. दिल्लीचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या एलबीडब्ल्यू अपील दरम्यान घडल्याचे समजले जात आहे. चौधरी यांनी एकप्रकारे सनरायझर्सचा कर्णधार वॉर्नरला डीआरएस घेण्यापासून रोखले असल्याचे म्हटले जात आहे. (SRH Vs DC, IPL 2020: सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी विजय)

डीसीच्या धावांचा पाठलाग करताना १७व्या षटकात संदीप शर्माच्या पूर्ण लांबीचा चेंडू पॅड्सवर लागला. सनरायझर्सच्या खेळाडूंनी एकजुटीने अपील केले, पण हा जयजयकार चौधरी यांनी फेटाळून लावली. त्यानंतर पंच अनिल चौधरीने नॉट आऊट दिल्यावर आपला हात दाबला आणि सांगितले की चेंडूने बॅटच्या किनाऱ्याला लागला आहे आणि वॉर्नरच्या टीमने डीआरएस न घेण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या अटींनुसार कोणताही खेळाडू पंचांचा सल्ला घेऊ शकत नाही. तो केवळ मैदानातच आपल्या खेळाडूंसह पुनरावलोकनावर चर्चा करू शकतो. मैदानाबाहेर किंवा ड्रेसिंग रूममधूनही पुनरावलोकनाबद्दल चर्चा केली जाऊ शकत नाही. आयपीएलच्या नियमांनुसार याला कलमांचे उल्लंघन मानले जाते.

दरम्यान, या घटनेनंतर स्टार स्पोर्ट्स डगआऊटमध्ये भाष्य करणारे स्कॉट स्टायरिस, संजय बांगर आणि ब्रेट ली यांनीही अंपायर चौधरी यांच्या हावभावावर प्रश्न उपस्थित केले. हैदराबादने दिल्लीविरुद्ध 219 धावांची मोठी धावसंख्या उभारली आणि दिल्लीवर दबाव आणला. यानंतर हैदराबादने या सामन्यात दिल्लीला 88 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आणि प्ले ऑफमधील आपले आव्हान कायम ठेवले. 12 सामन्यात 10 गुणांसह एसआरएच आयपीएल पॉईंट्स टेबलवर सहाव्या स्थानावर, तर दिल्ली कॅपिटल्स 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.