इंडियन प्रिमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सीजनला 19 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर ट्विटरने आज (14 सप्टेंबर) रोजी आयपीएल मधील संघांचे 9 स्पेशल इमोजी (Special Emojis) लॉन्च केले आहेत. इंग्रजीसह सहा भारतीय भाषांमध्ये हॅशटॅग वापरुन तुम्ही या इमोजीचा वापर करु शकता. या नऊ इमोजींचा वापर करुन चाहते आपल्या टीमला पाठिंबा दर्शवू शकतात. तसंच लाईव्ह कर्न्व्हसेशनला फॉलो करु शकतात किंवा त्यामध्ये सहभाग घेऊ शकतात. याबद्दल लवकरच अजून काही अपडेट्स येतील. तोपर्यंत 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघातील पहिल्या सामन्याला #MIvCSK वापरुन ट्विटरवर फॉलो करा, असे ट्विटरने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
टीम इमोजी अनलॉक करणारे काही हॅशटॅग पुढील प्रमाणे आहेत- #OneFamily, #WhistlePodu, #PlayBold, #KorboLorboJeetbo, #SaddaPunjab, #OrangeArmy, #HallaBol, आणि #YehHaiNayiDilli. (IPL 2020 Most Expensive Captain: आयपीएल 13 मध्ये 8 संघांची धुरा सांभाळणार 'हे' खेळाडू, जाणून घ्या कोणाला मिळतात सर्वाधिक पैसे)
Twitter India Tweet:
Presenting the new #IPL2020 Twitter emojis👇Which team are you backing? Tell us with an emoji. pic.twitter.com/exsDfIBEoU
— Twitter India (@TwitterIndia) September 13, 2020
2020 सीजनच्या आयपीएलची सुरुवात शनिवारी, 19 सप्टेंबर रोजी मुंबई आणि चेन्नई संघातील सामन्याने होणार आहे. आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्याचे विजेते आणि उपविजेते यांच्यात यंदाच्या सीजनचा पहिला सामना रंगणार आहे. (IPL 2020 Theme Song Copied? आयपीएल 13 थीम सॉन्गचे संगीतकार प्रणव अजयराव मालपेने फेटाळला कॉपी केल्याचा आरोप, रॅपर कृष्णा ने दिली 'ही' प्रतिक्रिया)
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामधील आयपीएलचा पहिला सामना हा 29 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार होता. परंतु, कोरोना व्हायरस संकटामुळे आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यात आले आणि सर्व सामने UAE मध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदाची आयपीएल ट्रॉफी आपल्या आवडत्या संघाने जिंकावी असा चाहत्यांचा मानस आहे. दरम्यान आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स संघाची विजेतेपद पटकवण्याची शक्यता अधिक आहे.