आयपीएल 2020 थीम सॉन्ग (Photo Credits: Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 2020 आवृत्तीसाठी त्याने तयार केलेले थीम सॉन्गवर चोरी केल्याचे आरोप खोटे असल्याने संगीतकार प्रणव अजयराव मालपे (Pranav Ajayrao Malpe) याने स्पष्टीकरण दिले आणि आरोप फेटाळून लावले. दिल्लीस्थित रॅपर कृष्णाने (Rapper Krsna) मंगळवारी आयपीएलवर (IPL) यावर्षी त्यांचे थीम सॉन्ग “देखो आया वापस” (Aayenge Hum Wapas) या ट्रॅकची चोरी केली असल्याचा आरोप केला होता. ‘आयेंगे हम वापस ’ही एक कठीण रचना आहे जी मी आणि माझ्या टीमने कठोर परिश्रम आणि प्रयत्नातून तयार केली आहे.हे इतर कोणत्याही कलाकाराच्या कार्याद्वारे प्रेरित झाले नाही. या वस्तुस्थितीची पुष्टी म्युझिक कंपोजर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (Music Composers Association of India) दिली आहे. माझ्यावरील हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत,” प्रणवने म्हटले. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आयपीएल (IPL) या महिन्यात सुरू होणार आहे. पण यापूर्वी त्यांच्या थीम सॉन्गवरून वाद सुरू झाला आहे. तथापि, हे सर्व आरोप संगीतकार प्रणव अजयराव मालपे यांनी फेटाळून लावले आहेत. (IPL 2020 Theme Song: आयपीएल 13 चे थीम सॉन्ग ‘आयेंगे हम वापस’ कॉपी केलेले? ‘देख कौन आया वापस’ गाण्याची नक्कल केल्याचा रॅपर कृष्णाने केला आरोप)

प्रणवने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते थीम सॉन्ग चोरल्याच्या आरोपामुळे आश्चर्यचकित झाले. “सध्याच्या महामारीच्या परिस्थितीमुळे प्रत्येकजण ज्या संघर्षातून जात आहे ती व्यक्त करणे आणि त्यांना आशा व प्रेरणा देणे हा आमचा एकच हेतू होता. मला आशा आहे की प्रत्येकाला गाणे आवडेल,” प्रणवने पुढे म्हटले. दुसरीकडे, प्रणवच्या स्पष्टीकरणानंतर आणि म्युझिक कंपोजर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या निर्णयावर रॅपर कृष्णाने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले, "हे धडकी भरवणारा आहे! मला नुकताच कळले की ‘म्युझिक कंपोझर असोसिएशन ऑफ इंडिया’ ने म्हटले की हिप हॉपच्या गाण्यांची चोरी त्यांच्या मते योग्य आहे कारण सर्व हिप हॉप गाणी सारखीच असतात. शाबाश! तुम्हारा खून खून, हमरा खुना पानी!." अशा शब्दात कृष्णाने संताप व्यक्त केला.

दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यावर यूजर्सकडून विविध मिम्स व्हायरल होत आहे. तुम्हीही पाहा...

त्यांना काय कळेल

आयपीएल थीम सॉन्ग

रॅपर कृष्णाला क्रेडिट द्या

19 सप्टेंबर हा इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना खेळला जाईल. या दरम्यान, रॅपर कृष्णाने त्याचे गाणे चोरी केल्याचा आरोप आहे. तो म्हणाला की आयपीएलच्या थीम सॉन्गचे संगीत त्याच्या 'देख कौन आया' गाण्यामधून चोरीला गेले आहेत. संगीतकार प्रणव अजयराव मालपे यांनी आयपीएलचे थीम सॉंग बनवले आहे. हे गाणे कोरोना महामारीने आणि त्यास कसे सामोरे जावे याद्वारे प्रेरित आहे.