IPL 2020 Theme Song: काही वेळापूर्वी इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या हंगामाचे थीम सॉन्ग रिलीज करण्यात आले. आयपीएल (IPL) 2020 चा थीम ट्रॅक ‘आयेंगे हम वापस’ (Aayenge Hum Wapas) आहे. हे गाणे अत्यंत सकारात्मक आहे. आयपीएलचे 13 वे सत्र 19 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यंदा कोविड-19 मुळे क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये जाऊ शकणार नाहीत, पण आयपीएलच्या थीम सॉन्गमुळे (IPL Theme Song) क्रिकेटवरील जनतेच्या उत्साहात नक्कीच वाढ होईल. हे गाणे पुन्हा क्रिकेट नियमित होईल अशी आशा जागृत करेल. या गाण्यामध्ये सध्याच्या कोरोना महामारीला सामोरे जाणे आणि घरी बसून क्रिकेटचा आनंद लुटण्याचा संदेश देण्यात आला आहे. हे गाणे लाखो लोकांना उत्तेजन देत आहे, जे गेल्या 6 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे घरात कैद झाले आहेत. पण, या गाण्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कृष्णा नावाच्या रैपरने (Rapper Krsna) आयपीएलचे थीम सॉन्ग त्याचे ट्रॅक ‘देख कौन आया वापस’ मधून कॉपी केले असल्याचा दावा केला आहे. (IPL 2020 Theme Song: 'कम ऑन बुलावा आया है' ते 'इंडिया का त्योहार'; पाहा आयपीएलच्या 'या' 5 सर्वोत्कृष्ट जाहिराती आणि आठवणींना द्या उजाळा Watch Video)
याबद्दल त्याने एक ट्वीटही पोस्ट केले आणि म्हणाले की, आयपीएलने त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे गाणे वापरले आहे आणि त्याच्या मूळ आवृत्तीला श्रेयही दिले नाही. ट्विटमध्ये, दिल्लीस्थित रैपरने आपल्या मित्रांना रिट्वीट करून ते पुढे शेअर करण्यास सांगितले. कृष्णाने पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये आयपीएल आणि डिस्ने हॉटस्टारचे अधिकृत खातेही टॅग केले गेले आहे जे आयपीएल 2020 चे ऑनलाइन स्ट्रीमिंग भागीदार आहेत.
Hey guys, @IPL has plagiarised my song “Dekh Kaun Aaya Waapas” and created “Aayenge Hum Wapas” as this years anthem without credit or consent. I request my fellow artists and friends on twitter to RT this tweet for awareness, they can not get away with this. @DisneyPlusHS https://t.co/GDNFeyhXR5
— KR$NA (@realkrsna) September 7, 2020
कृष्णाने बनवलेल्या गाण्याचा व्हिडीओ पाहा:
या संपूर्ण प्रकरणाबाबतचे अधिकृत विधान अद्याप आयपीएलने जाहीर केले नाही. मेगा-इव्हेंटबद्दल बोलायचे झाले तर आयपीएल यंदा 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होईल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिला सामना रंगेल. स्पर्धेचा अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. दरवर्षी आयपीएल स्पर्धेपूर्वी आपले थीम सॉंग लॉन्च केले जाते, जेणेकरून क्रिकेट चाहत्यांनाही रोमांचक क्रिकेटचे टीझर बघायला मिळते. यावेळी कोरोना व्हायरसमुळे बर्याच अंतरानंतर क्रिकेट सामना खेळला जाणार असल्याने सर्वांमध्ये चाहत्यांसोबत खेळाडूंमध्येही मोठा उत्साह आहे.