कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आयपीएल (IPL) 2020 अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीगला स्थगित करण्याची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. 29 मार्च ते 24 मे या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी मंडळाकडे कोणतीही नवीन योजना नव्हती. या टूर्नामेंटमधून टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) क्रिकेट च्या मैदानावर पुनरागमन करणार होता, पण आता स्पर्धा पुढे ढकल्याने त्याचे आगमनही लांबणीवर गेले आह. यापूर्वी मंगळवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे (BCCI) वरिष्ठ अधिकारी सौरव गांगुली (अध्यक्ष), जय शाह (सचिव), ब्रिजेश पटेल (आयपीएल अध्यक्ष), अरुण धुमाळ (कोषाध्यक्ष) आणि हेमंग अमीन (आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी) उपस्थित होते. याआधी, कोविड-19 आणि चालू लॉकडाउनमुळे आयपीएल 15 एप्रिल आणि त्यानंतर 3 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले. जगभरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल ते 3 मे असा लॉकडाउनचा कालावधी वाढविला आहे. (IPL 2020: लॉकडाउन वाढीनंतर BCCI कडून आयपीएल अनिश्चित काळासाठी रद्द; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा)
यापूर्वी, बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल रद्द झाल्यावर 3000 कोटी रुपयांचे नुकसान होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलसंदर्भात मोठे विधान केले होते. गांगुली म्हणाले होते की सध्याच्या परिस्थितीत याची कल्पना करता येणार नाही. दरम्यान फॉर्मेट बदलून जून महिन्यात आयपीएल आयोजित करावयाची मंडळाची इच्छा होती. यामुळे सामन्याच्या संख्या कमी असत्या, मर्यादित शहरांत आयोजन आणि विदेशी खेळाडूंशिवाय स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र जर असे झाले असते तर विदेशी खेळाडूंना मोठा झटका बसला असता. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सर्वाधिक विदेशी खेळाडूंवर बोली लागवण्यात आली होती.
Indian Premier League 2020 season has now been postponed indefinitely: BCCI Official pic.twitter.com/5kWlfHCh54
— ANI (@ANI) April 15, 2020
देशासह अन्य ठिकाणच्या परिस्थिती सुधारत नसल्यामुळे आता स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. या महामारीमुळे देशात आतापर्यंत 377 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 11 हजार हुन अधिक जणं याच्याशी झुंज देत आहेत. देशातील लोकांसाठी दिलासा देणारी बातमी ही आहे की या साथीच्या आजारामुळे 1,306 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत.