IPL 2020 Schedule (Photo Credits: IPL20/ Edited )

IPL 12  Matchs Schedule PDF: युएई (UAE) येथे होणार्‍या इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL) चे वेळापत्रक बीसीसीआय कडुन जाहीर झाले असून 19 सप्टेंबर रोजी अबू धाबी (Abu Dhabi) येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील पहिल्या सामन्याने यंदाच्या प्रलंबित आयपीएल हंगामाची सुरूवात होईल. आयपीएलची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी होणार असून 10 नोव्हेंबर रोजी फायनल सामना खेळला जाईल. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा रविवारऐवजी दुसऱ्या दिवशी अंतिम सामना खेळला जाणार आहे. दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) टीममध्ये संध्याकाळी सामना खेळला जाईल. आयपीएलमध्ये यंदा 10 डबल-हेडर सामने आयोजित केले जातील. बीसीसीआयने यापूर्वी सर्व सामन्यांची वेळ जाहीर केली होती पण वेळापत्रक लांबणीवर पडले होते. शिवाय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी दिली जाणार आहे.

दरम्यान, तुम्ही आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक PDF स्वरूपात येथे पाहून शकता आणि डाऊनलोड करु शकता, अगदी मोफत.

दुसरीकडे, युएई मध्ये अबू धाबी (Abu Dhabi) , दुबई (Dubai) आणि शारजाह (Sharjah) अशा तीन ठिकाणी 56 दिवस होणाऱ्या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. एकूण 24 सामने दुबई, 20 अबुधाबी आणि 12 शारजाह येथे होतील. डबल-हेडर दरम्यान पहिला सामना दुपारी 3:30 वाजता आणि संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरु होणार आहेत. प्ले-ऑफ आणि अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळला जाईल हे मात्र अद्याप जाहीर जाहले नाही. 3 नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यातील सामन्याने ग्रुप स्टेजमधील सामने संपतील. आयपीएल 13 ची सुरुवात यंदा 29 मार्चपासून होणार होती, पण जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. अखेरीस भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे आयोजन करण्याचे निश्चित झाले. यापूर्वी 2014 मधील काही सामानाने लोकसभा निवडणुकीमुळे युएईमध्ये आयोजित करवण्यात आले होते.