जोस बटलर (Photo Credit: Instagram/rajasthanroyals)

इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी जोस बटलर (Jos Buttler) इंग्लंडकडून (England) उत्तम कामगिरी करत आहे. बटलरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर रविवारी साऊथॅम्प्टन येथे इंग्लंडच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने विजय मिळवला. यष्टिरक्षक फलंदाजाने 54 चेंडूंत नाबाद 77 धावा केल्या आणि यजमान टीमने 158 धावांचे लक्ष्य 7 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. यापूर्वी, बटलरने पहिल्या सामन्यात 29 चेंडूत 44 धावा केल्या. यजमान इंग्लंडच्या दुसर्‍या विजयात मुख्य भूमिका साकारल्यानंतर बटलरचे सोशल मीडियावर त्याच्या शानदार फलंदाजीबद्दल अनेकांनी कौतुक केले. ऑस्ट्रेलिया मालिकेच्या समाप्तीनंतर या महिन्याच्या अखेरीस आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) खेळणाऱ्या इंग्लिश खेळाडूचे ट्विटरवरील चाहत्यांनी कौतुक केले. यंदा आयपीएलमध्ये बटलरकडून रॉयल्स चांगल्या खेळाची अपेक्षा असेल. (ENG vs AUS 2nd T20: जोस बटलरच्या नाबाद अर्धशतकाने इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने मात, मालिकेतही 2-0 ने विजयी आघाडी)

रविवारी इंग्लंडच्या विजयानंतर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) चाहत्याने रॉयल्सला बटलरला त्याच्या आवडत्या संघात घेण्यासाठी काय घ्या? असे विचारले. यूजरच्या या प्रश्नावर रॉयल्सने देखील झकास प्रतिक्रिया दिली आणि त्याची बोलती बंद केली. "मी पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सला विचारत आहे, जोस बटलर आरसीबीला द्यायला म्हणजे मी काय करावे?" - चाहत्याने ट्विटरवर लिहिले. रॉयल्सने त्वरित प्रतिसाद दिला आणि केबीसीमधील अमिताभ बच्चन यांचे एक मिम शेअर करत लिहिले, "आपण इच्छित असल्यास आपण सोडू शकता."

दरम्यान, बटलर राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलचे सुरुवाती सामने खेळू शकणार नाही. 16 सप्टेंबर रोजी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका संपल्यानंतर युएईला आगमन झाल्यानंतर बटलरला अनिवार्य क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणे आवश्यक असेल. आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले असून एकदा आयपीएल विजेतेपद जिंकलेले रॉयल्स आपला पहिला हंगामातील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळेल.