राजस्थान रॉयल्सचे फिल्डिंग प्रशिक्षक दिशांत याग्निक (Photo Credit: Twitter/RR)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) फिल्डिंग प्रशिक्षक दिशांत याग्निक (Dishant Yagnik) यांची कोविड-19 (COVID-19) टेस्ट सकारात्मक आढल्याचे समोर आले आहे. युएई येथे रवाना होण्यासाठी संघाच्या सदस्यांना पुढील आठवड्यात मुंबईत एकत्र येणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन ही चाचणी घेण्यात आली होती. शक्य तितकी कठोर प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी फ्रँचायझीने बीसीसीआयने शिफारस केलेल्या दोन चाचण्या व्यतिरिक्त सर्व खेळाडू, सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी युएईला रवाना होण्यापूर्वी व्यवस्थापनाने अतिरिक्त टेस्ट लागू केली होती. घरच्या मैदानावर राजस्थानचा विकेटकीपर फलंदाज म्हणून काम करणारा आणि आयपीएलमध्ये फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करणारे दिशांत सध्या आपल्या मूळ गावी उदयपुरमध्ये (Udaipur) असून त्यांना 14 क्वारंटाइनसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फ्रॅन्चायझीने गेल्या 10 दिवसांत दिशांतच्या जवळ असलेल्या प्रत्येकाला क्वारंटाइन करून कोरोना टेस्ट करवण्याची विनंती केली. (IPL 2020 Teams Squad Update: बंगालचे वेगवान गोलंदाज आकाशदीप, सयान घोष यांची राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेट गोलंदाज म्हणून निवड)

दरम्यान, मागील 10 दिवसांत राजस्थान रॉयल्स किंवा अन्य आयपीएल खेळाडूंशी दिशांतचा कोणत्याही नजीकचा संबंध नव्हता याचीहीफ्रँचायझीने पुष्टी केली. “14 दिवसानंतर बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार दिशांतची दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. दोन नकारात्मक नवे अहवाल आल्यावर त्याला 6 दिवस स्वत: क्वारंटाइन करून संघात प्रवेश करण्याची मुभा दिली जाईल आणि युएईमध्ये आल्यावर त्याची आणखी तीन नकारात्मक टेस्ट आल्या पाहिजेत,” राजस्थान रॉयल्सने एका निवेदनात म्हटले आहे.

19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीयामध्ये (युएई) सुरु होणाऱ्या आयपीएलची चाहत्यांप्रमाणे खेळाडूंनाही उत्सुकता लागून आहे. यंदा आयपीएल एकूण 53 दिवस चालेल, शिवाय स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा अंतिम सामना रविवार ऐवजी अन्य दिवशी खेळला जाईल. आयपीएल फायनल यंदा 10 नोव्हेंबर रोजी, मंगळवारी आयोजित केला जाईल. 20 ऑगस्टनंतर सर्व फ्रँचायसी युएईसाठी रवाना होतील.