सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील रोमांचक सामन्यात राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि खलील अहमद (Khaleel Ahmed) यांच्यातील वादाने सामन्याला वेगळेच वळण दिले. सनरायझर्स आणि रॉयल्स यांच्यातील रोमांचक सामन्यात तेवतिया पुन्हा एकदा बॅटने हिरो ठरला आणि 12व्या ओव्हरमध्ये 78 धावांवर 5 विकेट गमावलेल्या रॉयल्सला रियान परागच्या (Riyan Parag) साथीने दमदार पुनरागमन करून दिले. संघाची परिस्थिती चांगली नसल्याने ही जोडी सुरुवातीला सावधगिरीने खेळली, पण, रॉयल्सला 65 धावांची गरज असताना त्यांनी शेवटच्या पाच षटकांत गिअर्स बदलले. 16 व्या षटकात परागने खलील अहमदला षटकार ठोकले आणि रॉयल्सने त्या ओव्हरमधून 11 धावा जमवल्या. त्यानंतर सामन्याचे चित्रच बदलले जेव्हा दोघांनी संदीप शर्माच्या 17व्या ओव्हरमध्ये 18 धावा लुटल्या. त्यानंतर 20व्या ओव्हरमध्ये खलीलच्या चेंडूवर परागने षटकार ठोकला. यानंतर तेवतिया आणि खलीलमध्ये मैदानावरच वाद झाला. (SRH vs RR, IPL 2020: राजस्थान रॉयल्सच्या मदतीला धावून आले राहुल तेवतिया-रियान पराग; SRHवर 5 विकेटने मात करत मोडली पराभवाची मालिका)
दोघांमध्ये कोणत्या कारणास्तव वाद झाला याबद्दल अद्याप माहित पडले नाही, पण सामना संपल्यावर हे प्रकरण आणखी वाढले. एसआरएचचा कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) लवकरच शांतता दाखवताना हस्तक्षेप केला तेवतियाशी बोलताना दिसला. यानंतर आश्चर्यकारक खेळाचे एका सुंदरपणे संपुष्टात आला जेव्हा खलील तेवतियाच्या खांद्यावर हात ठेवून शांतता प्रस्थापित करताना दिसला. पाहा हा व्हिडिओ:
#Tewatia #rahane #RahulTewatia #KhaleelAhmed #IPL2020Updates #ipl2020
khaleel ahmed fight with Rahul tewatia in last over during RR and SRH. After that Warner steps in and tries to calm Tewatia down. watch full video. pic.twitter.com/apMefjZN9P
— खबरीलाल जी (@khabrilaljinews) October 11, 2020
डेविड वॉर्नरची मध्यस्ती
Tewatia was not happy with khaleel 🗣👀 #SRHvsRR #SRH pic.twitter.com/sfMuXzM4Ev
— Gautam (@Gautamgaduu) October 11, 2020
दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे तर तेवातियाने रॉयल्सकडून 45 धावांची झंझावाती खेळी केली तर परागने विजयी षटकार ठोकला आणि रोमांचक सामन्यात हैदराबाद संघाचा पाच गड्यांनी पराभव केला. या दोन्ही फलंदाजांमध्ये 85 धावांची भागीदारी झाली. दोन्ही फलंदाजांचा डाव रॉयल्ससाठी 'गेमचेंजर' ठरला. यापूर्वी, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 158 धावांपर्यंत मजल मारली. मनिष पांडेचे अर्धशतक आणि वॉर्नरच्या 48 धावांच्या खेळीच्या बळावर हैदराबादने सन्माजनक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, हैदराबादची सुरुवात देखील खराब झाली आणि राजस्थानने 78 धावसंख्येवर 5 विकेट गमावल्या.