चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सध्या संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे आहे आणि आगामी आयपीएल (IPL) 2020 च्या हंगामात 19 सप्टेंबरपासून टीमचे नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे. युएईला (UAE) जाण्यापूर्वी धोनी 14 ऑगस्ट रोजी चेन्नईतील आपल्या साथीदारांसह प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी रांचीहुन (Ranchi) निघाला. धोनीच्या निवृत्तीनंतरच्या काही दिवसांनंतर झिवाच्या (Ziva) अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता आणि "मिस यू आणि बाईक राइडिंग मिस" असे लिहिले होते. आणि आता, तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुन्हा एक गोंडस व्हिडिओ पोस्ट काण्यात आला असून त्यात ती वडिलांच्या पेन्सिल स्केच हातात घेऊन उभी असल्याचे दिसून येत आहे. या पोस्टला आणखीन खास बनवण्यासाठी धोनीची पत्नी साक्षीही यात सामील झाली. (Deepak Chahar COVID-19 Test: कोरोना व्हायरसवर मात करून दीपक चाहर प्रशिक्षणासाठी परतला, मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी करणार तयारी)
"झीवा, तो कोण आहे?" असे साक्षीने विचारल्यावर झीवा उत्तर देत म्हणते, "हे पापा आहे." साक्षी पुन्हा एकदा पुष्टी करण्याचा प्रयत्न करते आणि विचारते, "तुला खात्री आहे?" त्यानंतर झीवा म्हणते, "महेंद्र सिंह धोनी. मला खात्री आहे." "पापाचा सर्वात मोठा चाहता!" असे कॅप्शन देऊन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. युएईला पोहोचल्यानंतर संघातील दोन खेळाडूंसह एकूण 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले ज्यांनंतर क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यावर खेळाडूंनी मैदानी प्रशिक्षण सुरु केले. धोनी आणि सीएसकेचे खेळाडू कुटुंबीयांशिवाय युएईला गेले आहेत, अशा स्थितीत सीएसके कर्णधारांची मुलगी झिवाला वडिलांना घरातून समर्थन संधी मिळाली. पाहा झिवाचा गोंडस व्हिडिओ:
कोरोना व्हायरस लॉकडाउन कालावधीत, बाप-लेकीची जोडी रांची येथील फार्महाऊसमध्ये खूप मजा करताना दिसले. त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळण्यापासून बाईक चालवण्यापर्यंत त्यांनी सर्व काही केले. 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी सध्या युएईमध्ये सीएसकेच्या सराव शिबिरात घाम घालत आहे. 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्स हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना करतील. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नुकत्याच एका व्हिडिओत धोनीने टीमच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान विकेटकीपिंगचा सराव करत सर्वांना चकित केले.