ईशान किशन, सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IPL 2020 Most Sixes and Fours: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामनाही पूर्ण झाला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फायनलमध्ये पोहचली असून त्यांना आता विरोधी टीमची प्रतीक्षा आहे. मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत 18 पॉईंट्स घेत अव्वल स्थानावर साखळी फेरी संपुष्टात आणली. आयपीएलच्या (IPL) गुणतालिकेत मुंबईने अव्वल राखले असून त्यांचे फलंदाजही आयपीलच्या सर्वाधिक विकेट, सर्वाधिक षटकार (Most Sixes) आणि चौकारांच्या यादीत राज्य करत आहेत. जसप्रीत बुमराहने आजवर स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम नोंदवला आहे. बुमराहने 15 सामन्यात 27 विकेट घेतल्या असून त्याने 'पर्पल कॅप' काबीज केली आहे. मुंबईसाठी यंदा कर्णधार रोहित शर्मा बॅटने अपयशी ठरला असला तरी मुंबईच्या मधल्या फळीतील- ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी शानदार कामगिरी करत चाहते आणि टीकाकारांनाही प्रभावित केले आहेत. (IPL 2020 Prize Money: आयपीएल बक्षिसाच्या रकमेत झाली कपात, विजेत्या संघाला ट्रॉफीसह मिळणार 'इतके' कोटी रुपये)

सूर्यकुमार आणि ईशानच्या मजबूत फलंदाजीमुळे मुंबईच्या मधल्या फळीची ताकद अजून वाढली आहे. आयपीएलमध्ये यंदा सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ईशानने पहिले स्थान मिळवले आहे. सूर्यकुमारने मुंबईसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 15 सामन्यात 461 धावा केल्या आहेत ज्यात तब्बल 60 चौकरांचा समावेश आहे. पण सूर्यकुमार नक्कीच टक्कर मिळत आहे. 'स्काय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या या फलंदाजानंतर शिखर धवन असून त्याने 58 आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर 52 चौकारांसह चौथ्या स्थानावर आहेत. हे दोघे फलंदाज आज सामना खेळणार असल्याने आजच्या सामन्यातून दोंघांना पहिले स्थान मिळवण्याची नक्कीच संधी आहे.

दुसरीकडे, ईशानने आजवर स्पर्धेत एकूण 29 षटकार ठोकले आहेत. मुंबईचा हा युवा फलंदाज अव्वल स्थानावर असून त्याला त्याच्याच संघाच्या 'कुंग फू पांड्या' हार्दिककडून टक्कर मिळू शकते ज्याने 25 षटकार मारले आहेत. त्यानंतर मुंबईचा आणखीन एक धडाकेबाज फलंदाज किरोन पोलार्ड 22 षटकारांसह या फलंदाजाला स्पर्धा देऊ शकतो. दुसरीकडे, 10 नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरच्या विजेत्याशी होईल.