SRH vs RCB, IPL 2020 Eliminator: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएलचा एलिमिनेटर (IPL Eliminator) सामना अबू धाबी येथे खेळला जात आहे. आजच्या सामन्यात हैदराबादने शानदार गोलंदाजी करत आरसीबी फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. आरसीबीने (RCB) फक्त 62 धावांवर 4 विकेट गमावल्या. पॉवर-प्ले मध्ये हैदराबादने वर्चस्व गाजवले तर बेंगलोर फलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. आजच्या सामन्यात आरसीबीच्या क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळाले, तर त्यांच्या अष्टपैलू मोईन अलीने (Moeen Ali) नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. आजच्या सामन्यात विराट कोहली पहिल्यांदा देवदत्त पडिक्क्लसोबत फलंदाजीला आला. डावाची तुफान सुरुवात करण्याच्या निर्धारात असलेला आरसीबी फलंदाज यंदा काही खास कामगिरी करू शकला नाही आणि स्वस्तात माघारी परतला. दुसरीकडे, मोक्याच्या क्षणी मोईन अली देखील दुर्दैवी रनआऊटचा शिकार बनला. (SRH vs RCB, IPL 2020 Eliminator: एबी डिव्हिलर्सने सावरला बेंगलोरचा डाव, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रॉयल चॅलेंजर्सची 131 धावांपर्यंत मजल)
शाहबाझ नदीमच्या नो बॉल एबी डिव्हिलिअर्सने एक धाव घेतली आणि स्ट्राईकवर मोईन आला. त्यानंतर फ्री-हिट खेळण्याची मोईनला संधी मिळाली ज्यावर तो एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद हौल पहिल्याच चेंडूवर एकही धाव न करता माघारी परतला. राशिद खानच्या अचूक थ्रोचा मोईनला आणि आरसीबीला मोठा फटका बसला. आयपीएलच्या इतिहासात एक फलंदाज फ्री-हिटवर रनआऊट झाल्याची ही पहिलीच घटना आहे. फ्री हिटच्या नियमानुसार फलंदाज फक्त धावबाद होऊ शकतो आणि खेळाडूला अन्य कोणत्याही प्रकारे बाद केले जाऊ शकत नाही, परंतु मोईन अलीच्या बाबतीत असेच घडले.
दुसरीकडे, आजच्या सामन्यात एबी डिव्हिलिअर्सच्या अर्धशतकी डावाने आरसीबीला 131 ची समाधानकारां धावसंख्या गाठून दिली. डिव्हिलिअर्सने 56 तर आरोन फिंचने 32 धावा केल्या. नवदीप सैनी नाबाद 9 आणि मोहम्मद सिराज नाबाद 10 धावा करून परतले. दुसरीकडे, हैदराबादसाठी जेसन होल्डरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. टी नटराजनने 2 आणि शाहबाझ नदीमने 1 विकेट घेतली. हैदराबाद आणि बेंगलोर यांच्यातील विजेता संघाचा दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सशी सामना होईल.