SRH vs RCB, IPL 2020 Eliminator: एबी डिव्हिलर्सने सावरला बेंगलोरचा डाव, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रॉयल चॅलेंजर्सची 131 धावांपर्यंत मजल

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा एलिमिनेटर सामना अबू धाबी येथे सुरु आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 131 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज एबी डिव्हिलिअर्सने डाव सावरत संघासाठी अर्धशतकी डाव खेळला आणि 56 धावा करून परतला. सनरायझर्सकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3, तर टी नटराजनने 2 आणि शाहबाझ नदीमला 1 विकेट मिळाली.

SRH vs RCB, IPL 2020 Eliminator: एबी डिव्हिलर्सने सावरला बेंगलोरचा डाव, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रॉयल चॅलेंजर्सची 131 धावांपर्यंत मजल
एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: PTI)

IPL 2020 Eliminator: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात आयपीएलचा (IPL) एलिमिनेटर सामना अबू धाबी येथे सुरु आहे. आजच्या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करत आरसीबी फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 131 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज एबी डिव्हिलिअर्सने डाव सावरत संघासाठी अर्धशतकी डाव खेळला आणि 56 धावा करून परतला. आरसीबीसाठी आरोन फिंचने 32 धावांचे योगदान दिले. हैदराबादसाठी गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आरसीबीच्या धावगातील वेसण घातली. सनरायझर्सकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3, तर टी नटराजनने 2 आणि शाहबाझ नदीमला 1 विकेट मिळाली. अबू धाबी येथे सुरु असलेल्या एलिमिनेटर सामन्यातील विजेता संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळेल, तर पराभूत होण्याऱ्या संघाचा आयपीएलमधील प्रवास संपुष्टात येईल. (IPL 2020: आयपीएलमध्ये पहिल्यांदाच घडले असे, मोईन अली Free Hit वर रनआऊट होणार ठरला पहिला क्रिकेटर)

टॉस गमावून पहिले फलंदाजी करण्यासाठी यंदा आरसीबीसाठी नवीन सलामी जोडी मैदानात उतरली. देवदत्त पडिक्क्लसोबत कर्णधार विराट कोहलीने डावाची सुरुवात केली. पण होल्डरने विराटला श्रीवत्स गोस्वामीकडे विकेटच्या मागे कॅच आऊट करत स्वस्तात माघारी धाडलं. विराटने 6 धावा केल्या. होल्डरने आरसीबीला दुसरा धक्का देत पडिक्क्लला बाद केलं. आरसीबीचा इन-फॉर्म फलंदाज आजच्या सामन्यात फक्त १ धावच करू शकला. त्यांनतर आरोन फिंच आणि डिव्हिलिअर्सने संघाचा डाव सावरला, पण नदीमने 32 धावांवर अब्दुल समदकडे झेलबाद करत माघारी धाडलं. मोईन अली फ्री-हिटवर चोरटी धाव घेताना राशिद खानच्या अचूक थ्रोमुळे रनआऊट झाला. डिव्हिलिअर्सने बेंगलोरसाठी एकाकी लढत दिली आणि 56 धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. होल्डरने शिवम दुबेला 8 धावांवर परतीचा मार्ग दाखवला.

दरम्यान, आजच्या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागला आहे. दुखापतीमुळे रिद्धिमान साहा संघाबाहेर झाला असून त्याच्या जागी श्रीवत्स गोस्वामीला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, बेंगलोरमध्ये 4 बदल झाले आहेत. क्रिस मॉरिसच्या जागी अ‍ॅडम झंपा, तर जोश फिलिप्पीची जागा फिंच, ईसूरु उदानाच्या जागी मोईन अली आणि शाहबाज अहमदच्याऐवजी नवदीप सैनीचा समावेश करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2020 09:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).