आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 30व्या सामन्यात राजस्थान रॉयल विरुद्ध टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने (Delhi Capitals Vs Rajasthan Royals) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघाने आपल्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु, दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, राजस्थानच्या संघाला सातपैकी केवळ 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. परिणामी, राजस्थानचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- IPL 2020 Mid-Season Transfer: आयपीएलच्या तेराव्या हंगामात इमरान ताहिर याला संघात जागा नाही? चेन्नई सुपर किंग्जचे सीएओ काशी विश्वनाथन यांनी दिली 'अशी' माहिती
संघ-
दिल्ली कॅपिटल: श्रेयस अय्यर (कर्णधार), कॅगिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमीयर, डॅनियल सायम्स, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, समृद्ध नॉर्टजे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, केमो पॉल
राजस्थान रॉयल्स: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अॅन्ड्र्यू टाय, कार्तिक त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, महिपाल लोमोर, ओशान थॉमस, रायन पराग, यशस्वा जयस्वाल, अनुज रावत, आकाशसिंग, जोफ्रा आर्चर, डेव्हिड मिलर, जोस बटवार, मनन वोहरा, शशांक सिंग, वरुण आरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी