IPL 2020: मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी आणि लसिथ मलिंगा यांच्यामध्ये आहे विशेष संबंध, रोहित शर्माची टीम पुन्हा बनणार चॅम्पियन? वाचा सविस्तर
मुंबई इंडियन्स (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 सुरु होण्यापासून आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत आणि चार वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला. आयपीएलच्या (IPL) इतिहासात आजवर सर्वाधिक विकेट्स घेणारा श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. याची घोषणा मुंबई इंडियन्सने केली असून आता जेम्स पॅटिनसनला संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएलच्या मागील 12 वर्षाच्या इतिहासात मलिंगाने तीन वेळा आयपीएलमधून माघार घेतली. मुंबई इंडियन्सला मलिंगाच्या अनुपस्थितीचा प्रत्येक वेळी फटका बसला. मलिंगा तीन हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग नसताना टीमला त्या तीन मोसमात फारशी कामगिरी केली नाही आणि पॉईंट टेबलमध्ये ही टीम पाचव्या स्थानावर राहिली. (आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का; वयैक्तिक कारणामुळे लसिथ मलिंगा स्पर्धेतून बाहेर)

2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली आणि त्यानंतर 2019 पर्यंत आयपीएलमध्ये मलिंगा तीन वेळा म्हणजेच 2008, 2016 आणि 2018 मध्ये मुंबईकडून खेळू शकला नाही. या दरम्यान मुंबई टीम गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिली. 12 हंगामांपैकी मलिंगा 9 वेळा टीमकडून खेळला ज्यामध्ये संघाने 4 वेळा विजेतेपद मिळवले. 2013, 2015, 2017 आणि  2019 मध्ये मुंबईने आयपीएल विजेतेपद जिंकले आणि या सर्व हंगामात मलिंगाने प्रभावी कामगिरी बजावली होती. याशिवाय 2009 वगळता, मलिंगा असताना हा संघ पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. मलिंगाने या संघासाठी नऊ हंगाम म्हणजेच 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2017 आणि 2019 मध्ये खेळला आहे. 2009 मध्ये मुंबई टीम 7 व्या क्रमांकावर, 2010 मध्ये उपविजेते, 2011 मध्ये तिसरे, 2012 मध्ये चौथा, 2013 मध्ये विजेता, 2014 मध्ये चौथा, 2015 मध्ये विजेता, 2017 आणि 2019 मध्येही विजेता ठरली.

म्हणजेच मलिंगा असताना केवळ 2009 मध्ये संघाने सातवे स्थान मिळवले केवळ मलिंगानेच नाहीतर अन्य वर्षांत या संघाने चांगली कामगिरी केली आहे. यंदा एका गोष्टीवर सर्वांची नजर असणार आणि ती म्हणजे की ज्या वर्षी मलिंगा खेळलेला नाही, त्या वर्षात मुंबईची टीम नेहमीच पाचव्या स्थानावर राहिली आहे, म्हणून जर आकडेवारीवर पहिली, तर यावर्षी मलिंगा खेळत नसताना तर मुंबईच्या विजयाची शक्यता कमी आहे. मलिंगाची अनुपस्थिती मुंबईसाठी धक्कादायक बाब आहे. मलिंगा हा एक अतिशय अनुभवी गोलंदाज आहे आणि तो या लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. मलिंगाने मुंबईकडून आजवर 122 सामन्यात 170 गडी बाद केले आहेत. आता अशा अनुभवी गोलंदाजांची अनुपस्थिती कर्णधार रोहित शर्मासाठी चिंतेची बाब ठरणार हे नक्की.