Lasith Malinga Opts Out Of IPL 2020: आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का; वयैक्तिक कारणामुळे लसिथ मलिंगा स्पर्धेतून बाहेर
लसिथ मलिंगा (फोटो सौजन्य-PTI)

इंडीयन प्रीमिअर लीग 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाविरोधात खेळण्यात आलेला अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाला विजय मिळवून देणारा लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आयपीएल 2020 स्पर्धेतून बाहेर गेला आहे. लसिथ मलिंगा याने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, अशी माहिती मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवरून दिली आहे. लसिथ मलिंगाच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता जेम्स पॅटीन्सनला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच जेम्स पॅटीन्स हा आठवड्याच्या अखेरीस अबु धाबीतील मुंबई संघाच्या ताफ्यात दाखल होणार, अशीही माहिती संघ व्यवस्थापनाच्या पत्रकात सांगण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा संपूर्ण क्रिडाविश्वावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली क्रिकेट स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. ज्यामुळे आयपीएल स्पर्धेतील संघ युएईमध्ये रवाना झाले आहेत. यातच आयपीएल सुरु होण्यापूर्वीच लसिथ मलिंगा संघाबाहेर गेला आहे. ज्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला लसिथ मलिंगाची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. लसिथ मलिंगा हा मुंबई संघाचे बलस्थान होते. लसिथ मलिंगाची अनुपस्थिती आम्हाला नक्कीच जाणवेल यात वाद नाही. पण मलिंगाची अडचणदेखील आम्ही समजू शकतो, असे मुंबई इंडियन्सचे मालक अनिल अंबानी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Lionel Messi Spotted Playing Dhol in Manchester: मॅनचेस्टर येथे पाकिस्तानी क्रिकेट जर्सीत लिओनेल मेस्सी याला ढोल वाजवताना पाहून नेटकरी चकित, पाहा Photo

ट्विट-

लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सच्या संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे. मलिंगाने मुंबई इंडियन्सच्या संघासाठी 122 सामने खेळले असून 170 बळी घेतले आहे. त्याने एका डावात 6 वेळा 4 बळी घेतले आहे. याशिवाय, त्याने आयपीएल 2011 मध्ये 13 धावांत 5 बळी टिपून वयैक्तिक सर्वोत्तम कामगिरी बजावली होती.