शुभमन गिल, शाहरुख खान (Photo Credit: IANS/Instagram)

कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) शनिवारी आयपीएल 2020 च्या 8व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderbad) 7 विकेटने पराभव केला आणि 13व्या हंगामात पहिल्यांदा विजयाची चव चाखली. युवा फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) नाबाद अर्धशतक आणि पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वात शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर केकेआरने यंदा आयपीएलमधील (IPL) पहिला विजय मिळवला. गिलने नाबाद 70 धावांच्या खेळीत 62 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकारांसह 2 षटकारही ठोकले. गिल आणि इयन मॉर्गन यांनी चौथ्या विकेटसाठी 92 धावांची नाबाद भागीदारी केली आणि टीमचा विजय निश्चित केला. मॉर्गनने 29 चेंडूत 42 धावा केल्या ज्यामध्ये तीन चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. केकेआरच्या विजयानंतर संघ मालक शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ट्विट करुन आनंद व्यक्त केला आणि विशेषत: युवा खेळाडूंचे अभिनंदन केले. (KKR vs SRH, IPL 2020: मनीष पांडेवर भारी शुभमन गिलची बॅट; हैदराबादचा सलग दुसरा पराभव, कोलकाता नाइट रायडर्सचा 7 विकेटने विजय)

शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की "संघातील सर्व मुलांनी एक चांगला सामना मिळविला आणि विजयी बाजू असल्याचा आनंद झाला. शुभमन गिल, नितीश राणा, शिवम मावी, नगरकोटी (स्वस्थ रहा) आपले स्वागत आहे वरुण आणि नाइट रायडर्स मधील मोठ्या लोकांनो, त्यांची काळजी घेणारे आपण शानदार आहेत." केकेआरने (KKR) एकीकडे आयपीएलमधील पहिला विजय नोंदवला तर हैदराबादला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादकडून मनीष पांडेने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली. पांडेने 38 चेंडूत 51 धावा केल्या. मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली आणि हैदराबादला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.

दरम्यान, आजच्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी केली आणि 20 ओव्हर केवळ 142 धावा केल्या. हैदराबादने दिलेल्या माफक धावांच्या प्रत्युत्तरात केकेआरने 18 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून हे लक्ष्य गाठले आणि गुणतालिकेत आता पाचवे स्थान मिळवले. केकेआरकडून शुभमन गिलने आयपीएलमधील पाचवे अर्धशतक ठोकले. गिलला आजच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीरच्या पुरस्काराने म्हणून गौरविण्यात आले. पॅट कमिन्सनेही सामन्यात शानदार पुनरागमन केले आणि 4 ओव्हरमध्ये 19 धावा देऊन 1 विकेट मिळविण्यात तो यशस्वी झाला. शुभमनव्यतिरिक्त नितीश राणाने 26 धावा केल्या, तर इयन मॉर्गन (Eoin Morgan) 42 धावा करून नाबाद परतला.