IPL 2020: 'वय, काहींसाठी फक्त आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण'! इरफान पठाणच्या ट्विटने चर्चांना उधाण, एमएस धोनी फॅन्स निराश
एमएस धोनी आणि इरफान पठाण (Photo Credit: PTI/Instagram)

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) शुक्रवारी 36 चेंडूत नाबाद 47 धावा फटकावल्या. या दरम्यान तो मैदानात संघर्ष करताना दिसला. धोनी 39 वर्षांचा असून आता त्याच्या फिटनेसबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सामन्यादरम्यान, 19व्या ओव्हरमध्ये धोनीला उष्णतेचा फटका बसला, फिजिओला मैदानावर बोलावून घ्यावे लागले व काही औषध घ्यावे लागले. सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणार्‍या धोनीला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये स्ट्राईक रोटेट करणे अवघड झाले आणि त्याने थोडा ब्रेकही घेतला. फलंदाजीच्या वेळीही सातव्या ओव्हरमध्ये फलंदाजीला आल्यावर धोनीने हैदराबादच्या गोलंदाजांविरुद्ध संघात करावा लागला. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी इरफान पठाणने (Irfan Pathan) एक ट्विट पोस्ट केले ज्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. (CSK vs SRH, IPL 2020: 'डॅडी आर्मी'वर भारी पडले युवा प्रियम गर्गचे अर्धशतक, हैदराबादच्या 7 धावांच्या विजयाने चेन्नई सुपर किंग्सचा सलग तिसरा पराभव)

या ट्विटमध्ये इरफानने कुणाचेही नाव घेतलेले नाही, परंतु असे दिसते की त्याने धोनीवर निशाणा साधला आहे. पठाणने लिहिले,"वय, काहींसाठी फक्त एक आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण असतं." फलंदाजीदरम्यान गर्मीमुळे आलेला थकवा आणि धापा टाकणाऱ्या धोनीचा फोटो सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. कर्णधारपदी धोनीने काही दिग्गज क्रिकेटपटूंना वाढते वय आणि तंदुरुस्तीमुळे स्थान दिले नव्हते. यामध्ये भारतीय क्रिकेटच्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

पठाणचे ट्विट

दरम्यान, पठाणच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे आणि अनेकांचे मत आहे की हे सीएसके कर्णधार एमएस धोनीच्या फॉर्मवर केले आहे. अनेकांनी धोनीच्या संथ गतीची टीका केली तर इतरांनी सीएसकेच्या कर्णधाराची त्याच्या लढाऊ मनोवृत्तीची प्रशंसा केली. पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:

कठोर?

तर्क?

खरचं?

हे धोनीसाठी होते का?

वय, फक्त एक संख्या आहे!

भारताच्या 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या टीमचा भाग असलेला इरफान धोनीच्या नेतृत्वात अनेक सामने खेळला. आयपीएलमध्येही तो चेन्नई सुपर किंग्ज आणि राइजिंग पुणे सुपरजाइंट्सचा भाग होता. दुसरीकडे, हैदराबादविरुद्ध सामन्यात 14 ओव्हर शिल्लक असताना फलंदाजीसाठी आल्यानंतरही धोनी सीएसकेचे विजयी नेतृत्व करू शकला नाही. इतर फलंदाजही विजयी योगदान देण्यात अपयशी ठरले परंतु धोनी नाबाद क्रीजवर असल्याने त्याच्यावर सर्वाधिक टीका केली जात आहे. चार सामन्यांतून तीन पराभवांसह, सीएसके गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.