IPL 2019: आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना दादर पोलिसांनी केली अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (File photo)

IPL 2019: सध्या आयपीएलचा 12 व्या सीझनला सुरुवात झाली आहे. तसेच क्रिकेटप्रेमी आयपीएलसाठी फार उत्सुक दिसून येत आहे. आयपीएलच्या काळात सट्टेबाजी खेळणाऱ्या लोकांवर सुद्धा पोलिसांची कडक नजर असते. तर दादर पोलिसांनी आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीला अटक केली आहे.

शुक्रवारी झालेल्या कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkatta Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) संघाचा सामना झाला. त्यावेळी या सामन्यावर संजय लपासिया ह्याच्या घरी सट्टेबाजी सुरु होती. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच संजय ह्याच्या घरावर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच अन्य दोघांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून 20 मोबाईल, 25 सिम कार्ड, टीव्ही आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे.

पोलिसांनी या तिघांना रंगेहाथ पकडले असून कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच दादर पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.