महेंद्र सिंग धोनी सोबत सेल्फी फोटो काढण्याच्या उत्सुकतेमुळे क्रिकेटच्या मैदानात उडी, धोनीने चाहत्याला पळवले (Video)
महेंद्र सिंग धोनी सोबत सेल्फी फोटो काढण्याच्या उत्सुकतेमुळे क्रिकेटच्या मैदानात उडी, धोनीने चाहत्याला पळवले (Photo Crdits-Twitter)

दिग्गज क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी (M S Dhoni) याचे फॅन फॉलोअर्सची संख्या देशभरात खुपच आहे. धोनीसोबत फोटो काढण्यासाठी किंवा भेटण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तसेच कोणत्याही नियम आणि सुरक्षिततेची काळजी न करता त्याला भेटण्यासाठी अतिशय उत्सुक असल्याचे यापूर्वी ही दिसून आले आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ आयपीएल 2019 (IPL) साठी तयारी करत आहे. त्यावेळी धोनीचा एक चाहता क्रिकेटच्या मैदानावर आला आणि धोनीला हात मिळवण्याचा प्रयत्न केला. तर येत्या 23 मार्च रोजी चैन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर्समध्ये या 12 व्या सीझनचा पहिला सामना खेळवला जाणार आहे.

धोनीच्या चाहत्याचा हा व्हिडिओ सीएसके संघाने त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. यामध्ये तरुण धोनीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि हसत त्याच्या धावण्याचा प्रयत्न करतो. परंतु धोनी त्याला पळवत पुढे घेऊन जातो. तर मैदानातील सुरक्षारक्षक या तरुणाला त्याच्या या कृत्यामुळे मागे करतात खरे पण धोनी फक्त त्याला हात मिळवत असताना दिसून येत आहे.

यापूर्वीसुद्धा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सामना खेळताना अशाच एका चाहत्याने मैदानामध्ये उडी घेतली होती.त्याचे कृत पाहून सर्वजण दंग झाले होते. त्यावेळी भारतीय संघ फिल्डिंग करत असताना ह्या चाहत्याने असे कृत केल्याने त्याला नंतर आवरण्यात आले होते.