IPL 2019: आजचा किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाचा सामना रंगणार आहे. पंजाब येथील आय.एस.बिंद्रा स्टेडिअमवर (IS Bindra Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. तर आजवर बेंगलोर संघ अद्याप एक ही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आठव्या स्थानकावर या संघाचा आकडेवारीत क्रमांक दिसून येत आहे. सामन्याचा स्कोअर आणि लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विराट सेना सुद्धा यंदाच्या आयपीएल मध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी पाठी पडली आहे. कोहली आणि अब्राहम डिविलियर्स यांनी संघाला जिंकवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही त्यांना साथ देत नाही आहे. गोलंदाजीमध्ये बेंगलोरसाठी युजवेंद्र चहल व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाने उत्तम कामगिरी केली नाही आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीने 33 बॉलमध्ये 41 धावा काढल्या होत्या. तर मोईन अलीने 18 बॉल्समध्ये 32 धावा काढल्या होत्या.(हेही वाचा-
कोहली ह्याच्या नेतृत्वावर सध्या टीका करण्यात येत असून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच संघाची फिल्डिंगसुद्धा ठीक नव्हती. संघातील खेळाडूंनी अनेक झेल घेतले नसल्याचे पाहायला मिळाले आहे.