मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदा IPL Trophy ट्रॉफीवर नाव कोरणार अशी जोरदार चर्चा पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. आतापर्यं झालेल्या एकूण सामन्यांपैकी 9 सामने जिंकून 14 गुण मिळवत गुण तालीकेत मुंबई सद्या टॉपला आहे. आजवरचा आयपीएल सपर्धेतील अंकगणिताचा इतिहास पाहता अनेक लोक अंदाज वर्तवत आहेत की, यंदा आयपीएल चषकावर मुंबई इंडियन्सच राज करेन. आतापर्यंत तीन वेळा मुंबई इंडियन्सने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या आपेक्षा वाढल्या आहेत. उपांत्यपूर्व फेरीत मुंबई इंडियन्सचा सामना येत्या मंगळवारी म्हणजे उद्याच चेन्नई सुपर किंग्ज (CSK)संघाशी होणार आहे.
मुंबई इंडियन्स या आधी तीन वेळा आयपीएल चॅम्पीयन बनली आहे. सर्वात आगोदर 2013 मध्ये मुंबईने रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली आयपीएल ट्रॉफी मिळवली होती. त्यानंतर एकआडएक अशा वर्षांनी मुंबई इंडियन्स आयपीएल जिंकत आली आहे. अनेकांच्या मते हेच अंकगणित मुंबई इंडियन्स आयपीएल 2019 वर आपला दावा ठोकण्यास कारणीभूत ठरु शकतो.
मुंबईच्या विजयासाठी एमएस धोनीचे कनेक्शनही कारणीभूत ठरते असे क्रिडारसिकांना वाटते. आयपीएल 2013 च्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना मुंबई इंडियन्स संघासोबत होता. तर, 2015 मध्ये चेन्नई आणि मुंबई पुन्हा एकदा आमने-सामने आले. 2017 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चैन्नई सुपर किंग्जला दोन वर्षांची बंदी स्वीकारावी लागली. त्या वर्षी उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि पुणे संघात खेळला गेला. जवळपास या सर्व सामन्यांत मुंबई संघाने बाजी मारली. आता 2019 मध्ये पुन्हा एकदा धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा मुंबई संघासमोर उभा ठाकला आहे. अंकतालिका आणि मुंबई इंडियन्स संघाचा इतिहास पाहता या संघाचे स्थान बळकट दिसते. असे असले तरी, हा खेळ आहे आणि कोणत्याही खेळात काय होईल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगणे तसे कठीणच. (हेही वाचा, ICC Cricket World Cup 2019 पूर्वी भारत संघाला मोठा धक्का बसणार,केदार जाधव संघातून बाहेर पडण्याची शक्यता)
दरम्यान, मुंबई संघ भलेही क्वालिफायर मध्ये धोनीच्या संघावर भारी पडताना दिसत आहे. मात्र, एलिमिनेटर आणि फायनल अशी स्थिती अनेकदा उलटी दिसते. 2014 आणि 2012 च्या एलिमिनेटर मध्ये, 2011 च्या दुसऱ्या क्वालीफायर आणि 2010 च्या फायनलमध्ये धोनीचा संघ मुंबईच्या संघाला भारी पडला आहे. त्यामुळे यंदा काय घडते याबबत उत्सुकता आहे.