David Warner of Sunrisers Hyderabad (Photo Credits: IANS)

ऑस्ट्रेलिया संघाचा डेव्हिड वॉर्नर (David Warner) इंडियन प्रिमियर लीगमध्ये (Indian Premier League) सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyadrabad) संघात विशेष कामगिरी करुन आता मायदेशी परतत आहे. या निमित्ताने त्याने खास मेसेज क्रिकेटप्रेमींसोबत शेअर केला आहे. किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध काल झालेला सामना त्याचा शेवटचा सामना ठरला. आता तो वर्ल्ड कपसाठी मायदेशी रवाना होत आहे. पंजाब विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर समाधानी मनाने त्याने सहकाऱ्यांचा निरोप घेतला.

या सामन्यानंतर वॉर्नरने इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहिली. त्यात त्याने लिहिले की, "सनरायजर्स संघाने दिलेल्या पाठींब्याबद्दल खूप आभारी आहे. फक्त या सीजनमध्येच नाही तर गेल्या वर्षीही असाच पाठींबा मिळाला होता. या संघाकडून खेळण्यासाठी मला वाट पाहावी लागली. मात्र पुन्हा एकदा या सर्वांमध्ये येऊन मला छान वाटले. संघ मालक, साहाय्यक खेळाडू, सहकारी, सोशल मीडिया टीम आणि चाहते या सर्वांचे खूप खूप आभार. त्यांनी दाखवलेल्या विश्वासावर मी खरा उतरलो, याचा आनंद आहे.. पुढील वाटचालीसाठी संघाला शुभेच्छा.''

वॉर्नरची पोस्ट:

वॉर्नरचा एक व्हिडिओ देखील समोर येत आहे. या व्हिडिओ टीममेट भुवनेश्वर कुमारने शूट केला आहे.

पहा व्हिडिओ:

आयपीएलच्या 12 व्या हंगामात वॉर्नरने तब्बल 692 धावा केल्या. त्यात एका शतकासह 8 अर्धशतकांचा समावेश आहे.