Most Hat Tricks in IPL History: क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये हॅटट्रिक घेण्याचे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. आतापर्यंत अनेक दिग्गज गोलंदाजांनी हे कामगिरी बजावली आहे, तर इंडियन प्रीमिअर लीगमध्येही (Indian Premier League) अनेक हॅटट्रिक घेण्यात आल्या आहेत. आयपीएल (IPL) ही एक स्पर्धा असून त्याला फलंदाजांची टूर्नामेंट असे म्हणतात. क्रिकेटच्या वेगवान फॉरमॅटमध्ये बहुधा गोलंदाजांची लाईन आणि लेन्थ तेव्हा बिघडते जेव्हा फलंदाज लांब षटकार आणि चौकार मारतात. पण असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी या आश्चर्यकारक फलंदाजीच्या स्पर्धेत चेंडूसह जोरदार कामगिरी बजावली आहे. त्यांनी दोन-तीन वेळा हॅटट्रिक घेतली आहे. आयपीएल हॅटट्रिकबाबत (IPL Hat-tricks) बोलात तर या यादीमध्ये बरीच मोठी आणि आश्चर्यकारक नावे आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 वेळा हॅट्रिक घेण्यात आली आहे, परंतु कोणत्या गोलंदाजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेतली आहे, हे फारच कमी लोकांना माहिती असेल. (IPL 13: कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात 'या' 5 खेळाडूंनी केला तडाखा, खेळला तुफानी डाव; लिस्टमध्ये दोन भारतीयांचाही समावेश)
या लेखात जाणून घेऊ कोणत्या गोलंदाजाने घेतली आहे सर्वाधिक हॅट्रिक. विशेष म्हणजे पहिल्या 10च्या यादीत मुंबई इंडियन्सचा सद्यकालीन कर्णधार आणि फलंदाज रोहित शर्माचेही नाव सामील आहे. रोहितने 2009मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. 2008 मध्ये लक्ष्मीपती बालाजी आयपीएल हॅटट्रिक करणारा पहिला गोलंदाज ठरला होता. त्यांनीकिंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध हा कारनामा केला होता. दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक घेण्याचा विक्रम अमित मिश्राच्या नावावर आहे. मिश्राने 3 हॅटट्रिक घेतली असून पहिली त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स, दुसरी डेक्कन चार्जर्स आणि तिसरी हॅटट्रिक सनरायझर्स हैदराबादकडून घेतली. त्यानंतर युवराज सिंहने 2 हॅटट्रिक घेतल्या आहेत. युवीने दोन्ही हॅटट्रिक किंग्स इलेव्हन पंजाबसाठी घेतल्या.
याशिवाय, मखाया नटीनी, अजित चंडिला, सॅम्युअल बद्री, रोहित शर्मा, सॅम कुरन, अँड्र्यू टाय, प्रवीण तांबे आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एकदा आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेतली आहे. सलग तीन चेंडूत तीन बळी घेणे हे एका गोलंदाजांचे स्वप्न असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यॉर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगाच्या नावावर सर्वाधिक 5 हॅटट्रिक घेण्याच्या विक्रमाची नोंद आहे.