
International Cricket And IPL 2025 Match Schedule For Today: टाटा आयपीएल 2025 चा 34 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. आज, म्हणजेच 19 एप्रिल हा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. कारण या दिवशी अनेक रोमांचक सामने खेळले (Today Match Schedule) जातील. आज इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये डबल हेडर सामना खेळला जाईल. दिवसाचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल. तर, दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल. आज म्हणजेच 19 एप्रिल रोजी खेळल्या जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रसारण माहिती पाहूया.
आजच्या क्रिकेट सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक, थेट प्रक्षेपणासह:
क्रमांक | सामने | वेळ (IST) | स्थान | स्ट्रीमिंग / ब्रॉडकास्टिंग |
---|---|---|---|---|
1. | पाकिस्तान महिला विरुद्ध बांगलादेश महिला | सकाळी 10:00 वाजता | लाहोर सिटी क्रिकेट असोसिएशन ग्राउंड | फॅनकोड |
2. | वेस्ट इंडिज महिला विरुद्ध थायलंड महिला, 15 वा सामना | दुपारी 2:30 वाजता | लाहोर, गद्दाफी स्टेडियम | फॅनकोड |
3. | गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 35 वा सामना | दुपारी 3.30 वाजता | अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम, | जिओहॉटस्टार / स्टार स्पोर्ट्स |
4. | राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स | सायंकाळी 7.30 वाजता | जयपूर, सवाई मानसिंग स्टेडियम | जिओहॉटस्टार / स्टार स्पोर्ट्स |
5. | मुलतान सुल्तान्स विरुद्ध पेशावर झल्मी | सामना रात्री 8.30 वाजता | रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम | सोनी नेटवर्क, फॅनकोड अॅप |
प्रत्येक सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टिंग व्यवस्था वेगळी आहे. जेणेकरून क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या संघांचे आणि खेळाडूंचे प्रदर्शन पाहू शकतील.