
India Masters Cricket Team vs West Indies Masters Cricket Team: इंटरनॅशनल मास्टर्स लीग (IML) टी 20 2025 चा अंतिम सामना भारत आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यात रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 16 मार्च (रविवार) रोजी संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. पहिल्या उपांत्य सामन्यात इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा 94 धावांनी मोठ्या फरकाने पराभव केला. तर वेस्ट इंडिज मास्टर्सने श्रीलंका मास्टर्सचा 6 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य फेरीत, इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सविरुद्ध चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना संघाने 221 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या सामन्यात युवराज सिंगने 196.67 च्या स्ट्राईक रेटने 59 धावांची तुफानी खेळी केली.
कर्णधार सचिन तेंडुलकरनेही शानदार कामगिरी करत 42 धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नी (36 धावा, स्ट्राईक रेट 171.43), युसूफ पठाण (23 धावा, स्ट्राईक रेट 230) आणि इरफान पठाण (19 धावा, स्ट्राईक रेट 271.43) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. गोलंदाजीत, शाहबाज नदीमने 4 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा डाव उध्वस्त केला आणि इंडिया मास्टर्सला 94 धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (IML) टी20 2025 चा अंतिम सामना भारत आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यात आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल.
फायनलचे थेट प्रक्षेपण कुठे पहाल?
इंडिया मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यातील इंटरनॅशनल मास्टर्स लीग टी20 2025 च्या अंतिम सामन्याचे भारतातील कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्स वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाईल.