ICC Women's ODI, T20I Team Of The Year: महिला वनडे आणि टी-20 टीम ऑफ द इयर जाहीर, स्मृती मंधाना हिच्यासह 'या' भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश 
स्मृती मंधाना (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी (Ellyse Perry) आणि एलिसा हीली (Alyssa Healy) यांना आयसीसीने (ICC) 2019 मधील अव्वल पुरस्कार जाहीर केले आहे. आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये मर्यादित षटकांच्या (वनडे आणि टी-20) दोन्ही संघासाठी मेग लॅनिंग (Meg Lanning) हिला कर्णधारपद देण्यात आले आहे. वर्षाखेरीस आयसीसीने महिलांसाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिस पेरीने आयसीसीच्या महिला क्रिकेटर ऑफ द इयरचा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार आणि आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर म्हणूनही गौरविण्यात आले आहे. पेरीने स्त्रियांसाठी अ‍ॅशेस कसोटी सामन्यात एका शतकामिळून तीन शतकं केली आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 विकेट्स पूर्ण करणारी ती पहिली खेळाडू ठरली. सलामी जोडीदार आणि सह पुरस्कार विजेती एलिसा हीलीबरोबर पेरीने संपूर्ण 2019 मध्ये क्रीझवर वर्चस्व गाजवले. सलग दुसर्‍या वर्षासाठी टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर एलिसा हेलीने ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 61 चेंडूत नाबाद 148 धावांची खेळी करत विश्व विक्रमाची नोंद केली होती.

वनडे आणि टी-20 षटकांच्या दोन्ही संघांच्या कर्णधारपदी ऑस्ट्रेलिया आणि राष्ट्रीय संघाची कर्णधार लॅनिंगसह पेरी आणि हेली या दोघांनीही यावर्षीच्या महिला वनडे आणि टी-20 संघात स्थान मिळवले आहेत. शिवाय, आयसीसीच्या वनडे आणि टी-20 टीममध्ये भारतीय संघाच्या तीन खेळाडूंचा समावेश झाला आहे. स्मृती मंधाना (Smriti Mandhana)  ऐवजी शिखा पांडे (वनडे), झुलन गोस्वामी (वनडे), पूनम यादव (वनडे), दीप्ती शर्मा (टी-20) आणि राधा यादव (टी-20) यांचा वनडे आणि टी-20 टीम ऑफ द इयरमध्ये समावेश झाला आहे. आयसीसी पुरस्कार विजेते खालील प्रमाणे आहे:

विजेते

आयसीसी महिला उदयोन्मुख क्रिकेटर ऑफ द इयर

आयसीसी महिला टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर

आयसीसी महिला टी-20 टीम ऑफ द इयर

आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर

आयसीसी महिला वनडे टीम ऑफ द इयर

रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार

दरम्यान, वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असलेले महिला ऑस्ट्रेलिया संघ पुढील वर्षी घरच्या मैदानावर खेळताना महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपद कायम राखण्यास उत्सुक असेल. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 चा अंतिम सामना आंतरराष्ट्रीय महिला दिनी, रविवार 8 मार्चमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मेलबर्न क्रिकेट मैदानावर होईल. हा सामना महिला क्रीडामध्ये संभाव्य नवीन वर्ल्ड रेकॉर्ड गर्दी समोर खेळला जाईल. विश्वचषकचा पहिला सामना 21 फेब्रुवारीला खेळला जाईल.