India's Likely Playing XI 1st Test: टीम इंडिया (Team India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात 4 मार्चपासून मोहाली (Mohali) येथे सुरू होणार्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमनेसामने येणार आहेत. पहिल्या कसोटी सामन्यासह नवनियुक्त पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma0 कसोटी संघाची धुरा हाती घेईल. भारताला त्यांच्या मागील कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला, तर वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांची मागील कसोटी मालिका जिंकली असल्यामुळे श्रीलंकेचा आत्मविश्वास उंचावला असेल. गेल्या दोन वर्षांतील खराब कामगिरीमुळे भारताने अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना बाहेर करून त्यांच्याऐवजी युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. अशा परिस्थितीत आपण पहिल्या कसोटीसाठी भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे. (IND vs SL Test 2022: टीम इंडियाचा ‘हा’ दिग्गज कसोटी सामन्यात पुन्हा कहर करण्यासाठी सज्ज, श्रीलंका फलंदाजांची उडवणार तारांबळ)
मोहाली कसोटी सामन्यात भारतीय संघाची सलामी जोडी कर्णधार रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांची असेल. केएल राहुल अद्याप आपल्या दुखापतीतून सावरला नसल्यामुळे त्याला टी-20 मालिकेनंतर कसोटी मालिकेतूनही आराम देण्यात आला आहे. माजी कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर राहील, तर पुजारा आणि माजी उपकर्णधार रहाणे यांची जागा घेण्यासाठी संघात दिन खेळाडू आहेत. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी हे पुजारा-रहाणेच्या जागी खेळण्याचे दावेदार आहेत. पण टीम कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड युवा खेळाडूंना अधिक प्राधान्य देणे अपेक्षित आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. तर रहाणेच्या जागी पाचव्या क्रमांकावर शुभमन फलंदाजीला उतरण्याची मोठी शक्यता आहे कारण सध्या त्याचा सध्याचा फॉर्म मजबूत आहे आणि तो श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये नाबाद परतला होता.
ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर यष्टीरक्षक म्हणून दिसेल. तर पहिल्या कसोटीत रोहित 2 फिरकी गोलंदाज आणि 3 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीत हनुमा विहारी याला पुन्हा संधीची प्रतीक्षा करावी लागेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज भारतीय ताफ्यात असतील. अशा प्रकारे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन खूप मजबूत दिसत आहे. तथापि नाणेफेक दरम्यान अंतिम 11 खेळाडूंचे चित्र स्पष्ट होईल.
मोहाली कसोटीसाठी भारताचा संभाव्य प्लेइंग XI: रोहित शर्मा (कॅप्टन), मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, शुभमन गिल, रिषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.