Badminton Asia Team Championships 2024: भारताच्या महिला बॅडमिंटन संघाने बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या (Badminton Asia Team Championships 2024) अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत माजी विजेत्या जपानचा 3-2 असा पराभव (India Beat Japan) केला आणि प्रथमच या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. यामुळे भारताचे किमान रौप्य पदक निश्चित आहे. भारतीय महिला किंवा पुरुष संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघाच्या विजयाची हिरो ठरली ती 17 वर्षीय अनमोल खरब, जिने निर्णायक सामना जिंकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)