Photo Credit- X

India Women National Cricket Team vs Ireland Women National Cricket Team Match Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND W vs IRE W) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 विकेट गमावून 370 धावा केल्या. संघाच्या या मोठ्या डावात जेमिमा रॉड्रिग्जने शतक झळकावत 102 धावा केल्या, तर हरलीन देओलने 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.  स्कोअर कार्ड पहा

भारतीय कर्णधार स्मृती मानधनाने जलद सुरुवात केली आणि 54 चेंडूत 73 धावांनी मजबूत सुरूवात केली. त्यानंतर, प्रतिका रावलनेही 68 धावांची अर्धशतकी खेळी केली. हरलीन देओलचे शतक हुकले आणि ची 89 धावा करून बाद झाली. जेमिमा रॉड्रिग्जने तिचा शानदार फॉर्म कायम ठेवत 91 चेंडूत 102 धावा केल्या आणि भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.

भारत महिला विरुद्ध आयर्लंड महिला सामन्याचा स्कोअरकार्ड

आयर्लंडकडून ओर्ला प्रेंडरगास्ट आणि आर्लीन केली यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. भारतीय फलंदाजांच्या आक्रमक फलंदाजीसमोर त्यांची कामगिरी कमी पडली. ओर्ला प्रेंडरगास्टने 8 षटकांत 75 धावा देत 2 बळी घेतले. तर अर्लीन केलीने 10 षटकांत 82 धावा देत 2 बळी घेतले. भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे.