Rohit Sharma Records In T20 World Cup: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 (ICC T20 World Cup 2024) सुरु झाला आहे. वेस्ट इंडिज आणि यूएस यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा काल म्हणजेच 1 जूनपासून सुरू झाली. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत चमक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. सराव सामन्यापूर्वी संघाचे सर्व खेळाडू नेटमध्ये जोरदार सराव करत आहेत. भारतीय वेळेनुसार आजपासून म्हणजेच 2 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. या मेगा इव्हेंटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माकडून (Rohit Sharma) सर्वांना मोठ्या अपेक्षा असतील. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माची बॅट शांत दिसत होती पण रोहितला टी-20 विश्वचषकात काहीतरी आश्चर्यकारक कामगिरी करावी लागेल.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 मध्ये प्रथमच टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. 2007 मध्ये भारतीय संघासोबत टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये हिटमॅनचा समावेश आहे. रोहित शर्माच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा नववा विश्वचषक आहे. या मेगा टूर्नामेंटमध्ये रोहित शर्मा दुसऱ्यांदा कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. (हे देखील वाचा: USA Beat CAN: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेची मोठी कामगिरी, सामना जिंकून नावावर केला 'हा' मोठा हा विक्रम)
रोहित शर्माची टी-20 विश्वचषकाच्या मागील 8 हंगामातील कामगिरी
टी-20 विश्वचषक 2007 : आयसीसी टी-20 विश्वचषकाचा पहिला हंगाम 2007 मध्ये खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माने त्या विश्वचषकात 4 सामने खेळले. यादरम्यान रोहित शर्माने 88 धावा केल्या होत्या.
टी-20 विश्वचषक 2009 : टी-20 विश्वचषकाचा दुसरा हंगाम 2009 साली इंग्लंडमधील तीन मैदानांवर आयोजित करण्यात आला आणि पाकिस्तानने विजेतेपदाचा सामना जिंकला. या मेगा इव्हेंटमध्ये रोहित शर्माने 5 सामन्यात 32.75 च्या सरासरीने 131 धावा केल्या.
टी-20 विश्वचषक 2010 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला 2010 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात जास्त सामने खेळायला मिळाले नाहीत. रोहित शर्मा फक्त 3 सामने खेळला. या काळात रोहित शर्माने 84 च्या सरासरीने 84 धावा केल्या होत्या आणि नाबाद 79 धावा केल्या होत्या.
टी-20 विश्वचषक 2012 : 2012 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात टीम इंडिया सुपर 8 टप्पा संपल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडली होती. या मेगा इव्हेंटमध्ये रोहित शर्माने 5 सामन्यात 41 च्या सरासरीने 82 धावा केल्या आणि नाबाद 55 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
टी-20 विश्वचषक 2014 : वर्ष 2014 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र, अखेरच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या मोसमात रोहित शर्माची बॅट खूप मजबूत होती आणि त्याने 6 सामन्यात 40 च्या सरासरीने 200 धावा केल्या.
टी-20 विश्वचषक 2016 : टी-20 विश्वचषक 2016 मध्ये पुन्हा एकदा रोहित शर्माची बॅट शांत होती. रोहित शर्माने 5 सामन्यात 17.60 च्या सरासरीने केवळ 88 धावा केल्या होत्या.
टी-20 विश्वचषक 2021 : रोहित शर्माला 2021 साली झालेल्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले. या स्पर्धेत रोहित शर्माही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. रोहित शर्माने 5 सामन्यात 174 धावा केल्या होत्या. या काळात रोहित शर्माच्या बॅटने दोन अर्धशतकी खेळीही झळकावल्या.
टी-20 विश्वचषक 2021: टी-20 विश्वचषकच्या शेवटच्या मोसमात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने खेळलेल्या 6 सामन्यात 19.33 च्या सरासरीने 116 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्याने रोहित शर्मा स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.