IND-Women Vs SA-Women 3rd T20I Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ याच्यातील तिसरा टी-20 लाईव्ह सामना कुठे, कधी आणि कसे पाहणार? घ्या जाणून
क्रिकेट बॉल । प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

India Women Vs South Africa Women 3rd T20I: दक्षिण आफ्रिका महिला (South Africa Women's Team) संघाविरुद्ध सुरु असलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारतीय महिला संघाने (India Women's Team) निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या 2 एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील तिसरा टी-20 सामना लखनऊच्या (Lucknow) भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7:00 वाजता सामन्याला सुरुवात होईल तर याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार अ‍ॅपवर उपलब्ध असेल. शिवाय, स्टार स्पोर्ट्स 2/2 एचडी/3 वर प्रेक्षकांना लाईव्हा सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

मार्च 2020 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ पहिल्यांदा छोटा फॉरमॅट खेळण्यासाठी मैदानावर उतरली आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व मंधानासाठी करत आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीमध्ये खरोखरच प्रभावी कामगिरी केली आहे. ज्याने यजमान संघाची डोखे दुखी वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात पराभव पत्कारावा लागलेल्या भारतीय महिला संघ तिसऱ्या सामन्यात पराभवाची खपली काढण्याचा प्रयत्न करणार आहे. हे देखील वाचा- हे देखील वाचा- England's ODI Squad Against India: भारत विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; जोफ्रा आर्चर संघाबाहेर

संघ-

भारतीय महिला संघ:

स्मृती मंधाना (कर्णधार), शाफाली वर्मा, हर्लीन देओल, जेमीमह रॉड्रिग्स, रिचा घोष, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, नुझहत पारविन (विकेटकिपर), सिमरन बहादुर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड.

दक्षिण आफ्रिका महिला संघ:

लिझेल ली, बॉश, सून लूस (कर्णधार), लॉरा व्होल्वार्ड्ट, मिग्नॉन डू प्रीझ, लारा गुडॉल, सिनालो जाफ्टा (विकेटकिपर), नादिन डी क्लार्क, शबनीम इस्माईल, आयबॉन्गा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.