India Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 7th Match: आयसीसी महिला टी 20 विश्वचषक सुरू झाला (ICC Women’s T20 World Cup 2024)आहे. टी 20 विश्वचषकाचा सातवा सामना आज भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ(IND-W vs PAK-W ) यांच्यात होत आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3.30 पासून खेळवला जात आहे. भारताची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व फातिमा सना करत आहे. (हेही वाचा: India Women vs Pakistan Women, 7th Match Live Streaming: टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध आज 'करो या मरो'चा सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग)
टी 20 विश्वचषकात टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड महिला संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर टीम इंडियाला आता पाकिस्तान संघाविरुद्ध विजयाने आपले खाते सुरू करावे लागेल. संपूर्ण देश या सामन्याकडे लक्ष लावून आहे. एकीकडे पहिल्याच सामन्यात भारत हरला तर दुसरीकडे पाकिस्तान संघाने त्याच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून 2 गुण मिळवले आहेत. जर, आता हा सामना पाकिस्तान संघाने जिंकला तर, त्यांच्या दुणांत आणखी वाढ होईल. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषकातील गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करणयासाठी संपूर्ण तागद लावेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड:
आत्तापर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ एकूण 15 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 12, तर पाकिस्तानने 3 वेळा विजय मिळवला आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. या काळात टीम इंडियाने चार सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानने 2 सामने जिंकले आहेत.
खेळपट्टीचा अहवाल
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त ठरते. या खेळपट्टीवर, वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये हलके स्विंग पाहू शकतात. तर, फलंदाजांनाही सुरुवातीला सावध राहावे लागेल, परंतु एकदा स्थिरावल्यानंतर खेळपट्टीवर मोठे फटके खेळणे सोपे होऊ शकते. संघांना पहिल्या डावात किमान 150 धावा कराव्या लागतील. खेळपट्टीवरील दव दुसऱ्या डावात गोलंदाजांवर परिणाम करू शकतात. ज्यामुळे फलंदाजी सोपी होऊ शकते. नाणेफेक जिंकणारा संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.
हवामान स्थिती
दुबईतील सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ आणि गरम असण्याची अपेक्षा आहे. तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचू शकते. पावसाची शक्यता नाही.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया : स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (कर्णधार), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग ठाकूर.
पाकिस्तानः मुनिबा अली, गुल फिरोझा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (सी), तुबा हसन, नशरा संधू, डायना बेग, सादिया इक्बाल.