IND W (Photo Credit - X)

Indian Women National Cricket Team vs Ireland Women National Cricket Team ODI Live Streaming:  भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 10 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरसह कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती देण्यात आली आहे. हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत, सलामीवीर स्मृती मानधना कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, तर अष्टपैलू दीप्ती शर्मा उपकर्णधार असेल.  (हेही वाचा  -  PRS vs MLR BBL 2024-25 Dream11 Team Prediction: पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ जाणून घ्या)

दुसरीकडे या मालिकेत गॅबी लुईस आयर्लंडचे कर्णधार असेल. याशिवाय ओरला प्रेंडरगास्ट, अवा कॅनिंग, क्रिस्टीना कुल्टर रेली, अलाना डॅलझेल यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर भारतीय महिला संघ एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतील शानदार विजयानंतर वेस्ट इंडिजच्या महिलांविरुद्धच्या या मालिकेत प्रवेश करेल. टीम इंडियाने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा क्लीन स्वीप केला.

आयसीसी चॅम्पियनशिप अंतर्गत भारत आणि आयर्लंड यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत आयर्लंड 11व्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

तिन्ही एकदिवसीय सामने राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर होणार आहेत (संपूर्ण वेळापत्रक)

क्रमांक तारीख दिवस वेळ सामना स्टेडियम
1 10 जानेवारी  2025 शुक्रवार 11.00  वाजता पहिली वनडे निरंजन शाह स्टेडियम, राजकोट
2 12 जानेवारी  2025 रविवार 11.00 वाजता दूसरी वनडे निरंजन शाह स्टेडियम, राजकोट
3 15 जानेवारी  2025 बुधवार 11.00 वाजता तीसरा वनडे निरंजन शाह स्टेडियम, राजकोट

भारतीय महिला आणि वेस्ट इंडिज महिला यांच्यातील एकदिवसीय मालिका कुठे पाहू शकता

दोन्ही संघ

भारतीय संघ : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, उमा छेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीतस साधू, सायमा ठाकोर, सायली सातघरे

आयर्लंड संघ: गॅबी लुईस (कर्णधार), अवा कॅनिंग, क्रिस्टीना कुल्टर रीली, अलाना डॅलझेल, लॉरा डेलेनी, जॉर्जिना डेम्पसी, सारा फोर्ब्स, आर्लेन केली, जोआना लॉफरन, एमी मॅग्वायर, लेआ पॉल, ओरला प्रेंडरगास्ट, उना रेमंड-होई, रेबेका स्टोकेल