
आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने फलंदाजी करत भारतीय क्रिकेट महिला संघासमोर 186 धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून सलामीवीर एलिसा हेली आणि बेथ मूनी या दोघींनी अर्धशतकाची खेळी करून ऑस्ट्रेलियाच्या संघाला दमदार सुरूवात करुन दिली. या सामन्यात एलिसा हेलीने 75 तर, बेथ मूनीने सर्वाधिक 78 धावांची खेळी करुन संघासाठी मोठी धावसंख्या उभी केली. तसेच भारताकडून दिप्ती शर्मा हिने 2 तर, पूनम यादव आणि राधा यादव यांनी प्रतेकी 1-1 विकेट मिळवली आहे. भारतीय संघाने विश्वचषकाच्या संपूर्ण स्पर्धत चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. यामुळे हा विश्वचषकाचा किताब भारताने जिंकावा अशी भारतीयांची अपेक्षा आहे.