भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. हा सामना वेस्ट इंडीजने जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात वेस्ट इंडीजने भारताला 8 गडी राखून पराभूत केले. आता या मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना बुधवारी 11 डिसेंबरला मुंबईत खेळला जाईल. 

युजवेंद्र चहल च्या चेंडूवर षटकार मारत लेंडल सिमंसने अर्धशतक पूर्ण केले. वेस्ट इंडिजच्या सलामी फलंदाजाने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. विंडीजला विजयासाठी 24 चेंडूत 29 धावांची गरज आहे. 

14 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिमरोन हेलमेयर ने हवेत शॉट मारला. पण भारतीय कर्णधार विराट कोहली ने धावत येत सीमारेषेवर अप्रतिम झेल पकडला. हेलमेयर 23 धावावर बाद जाला. 

शिवम दुबेने भारतासाठी 13 वे ओव्हर टाकले. दुबेच्या या षटकात पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी एकूण आठ धावा केल्या. 13 ओव्हर नंतर विंडीजची धावसंख्या 99 आहे. विजयासाठी वेस्ट इंडीजला अजूनही 42 चेंडूंत 72 धावांची गरज आहे.

भारतीय संघाने दिलेल्या 171 धावांच्या लक्ष्यासमोर वेस्ट इंडीज संघाने 10 षटकांनंतर एक गडी गमावून 73 धावा केल्या आहेत. विजयासाठी अद्यापही विंडीज संघाला 60 चेंडूंत 98 धावांची गरज आहे.

वॉशिंग्टन सुंदर अखेरची ओव्हर टाकत आहे. आणि पाचव्या चेंडूवर त्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. इव्हिन लुईस मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू मिस झाला आणि रिषभ पंत ने त्याला स्टंप आऊट केले. लुईसने 40 धावा केल्या. 

वॉशिंग्टन सुंदरने भारतासाठी सहावी ओव्हर फेकले. सुंदरच्या या षटकात कॅरेबियन फलंदाजांनी एकूण 15 धावा केल्या. पहिल्या पॉवरप्लेनंतर कोणताही तोटा न करता संघाची धावसंख्या 41/0 आहे. इव्हिन लुईस 30 आणि लेंडल सिमन्स संघासाठी 9 धावांवर खेळत आहेत.

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीअस्थी आलेल्या टीम इंडियाला पहिले यश मिळता-मिळता राहिले. भुवनेश्वर कुमारच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर एव्हिन लुईसने षटकार मारण्याच्या हेतून शॉट मारला, चेंडू काही काळ हवेत राहिला, पण वॉशिंग्टन सुंदर ने कॅच सोडला. 

टॉस गमावून पहिले बॅटिंग करताना टीम इंडियाने 7 बाद 170 धावा केल्या. भारताकडून शिवम दुबे याने सर्वाधिक 54 धावा केल्या. विराट कोहलीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शिवमने प्रभावी कामगिरी केली आणि मिळालेल्या संधीचा उपयोग केला. विंडीजला जिंकण्यासाठी आणि मालिकेत कायम राहण्यासाठी 171 धावांचे लक्ष्य मिळाले आहेत. 

हेडन वॉल्श जुनिअरच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यर बाद झाला. 10 धावा करुन तो बाद झाला. भारताची 5 विकेट पडली.

Load More

रविवारी वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध दुसर्‍या सामन्यात भारतीय संघ (Indian Team) गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करून आणखी एक टी-20 मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. विंडीजविरूद्ध भारताने मागील 13 महिन्यांत 6 टी-20 सामने जिंकले आहेत आणि प्रत्येक वेळी विजयाची नोंद केली आहे. आता विराट कोहली (Virat Kohli) आणि संघाचे लक्ष्य सलग सातव्या टी-20 विजयावर असेल. पहिल्या सामन्यात भारताने सहा विकेट्सने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या मॅचमध्ये जिंकून टीम इंडिया मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. रविवारी सामना जिंकून भारताला फक्त दुसरी मालिका जिंकण्याची इच्छा नाही तर टी-20 विश्वचषकपूर्वी ज्या खेळाडूंचे संघात स्थान निश्चित नाही अशा खेळाडूंना आजमावण्याची संधीही मिळेल. शुक्रवारी भारतीय संघाने टी-20 क्रिकेटमधील 18.4 ओव्हरमध्ये विंडीजने दिलेले 208 धावांचे लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय होता.

केएल राहुल याने 40चेंडूत 62 धावा केल्या तर विराट कोहली याने नाबाद 94 धावांची खेळी करत कारकिर्दीतील सर्वोत्तम धावांची नोंद केली. जखमी शिखर धवन याच्या जागी खेळत असलेल्या राहुलने संधीचा पुरेपूर फायदा घेतला. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. त्याने 29 डावांमध्ये हा टप्पा गाठला. खराब फॉर्मशी झगडणाऱ्या रिषभ पंत यानेही दोन षटकार ठोकले. कोहलीच्या नेतृत्वात फलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली परंतु त्यांना अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

टी-20 संघात पुनरागमन करणारा भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. क्षेत्ररक्षणातही वॉशिंग्टन सुंदर आणि रोहित शर्मा यानेही काही महत्वाचे झेल सोडले. दुसरीकडे, कॅरेबियन संघ पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल आणि मालिका जिंकण्याची इच्छा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल, पण त्यासाठी त्यांना भारतीय फलंदाज, विशेषत: कोहलीच्या फलंदाजीला आळा घालण्याची गरज आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने23 अतिरिक्तधावा दिल्या आणि दुसऱ्या सामन्यात विंडीजला जर विजय मिळवायचा असेल, तर त्यांना गोलंदाजीत सुदर करण्याची गरज आहे.