India under-19 Team (Photo @BCCIWomen)

Indian Womens Under 19 National Cricket Team vs Sri Lanka Womens Under 19 National Cricket Team: आयसीसी अंडर 19 महिला टी-20 विश्वचषक 2025 चा 24 वा सामना भारतीय अंडर 19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका अंडर 19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे खेळला जाईल. भारतीय संघाने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी मलेशियाचा 10 गडी राखून पराभव केला. या दोन विजयांसह, भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. आता, तिसरा सामना जिंकून, टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये आपले स्थान पक्के करण्याच्या उद्देशाने प्रवेश करेल.

श्रीलंकेनेही स्पर्धेत केली चमकदार कामगिरी

दुसरीकडे, श्रीलंकेनेही स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या महिला संघाने त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकले आहेत आणि 4 गुणांसह गट अ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे आणि आता भारताला हरवून अव्वल स्थान गाठण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. (हे देखील वाचा: WI W vs BAN W 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा 60 धावांनी केला पराभव, मालिका 1-1 अशी बरोबरीत)

किती वाजता सुरु होणार सामना?

भारतीय अंडर 19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका अंडर 19 माहिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात गुरुवार, 23 जानेवारी रोजीक्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे सामना खेळला जाईल. तर दुपारी 12.00 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

कुठे पाहणार लाइव्ह सामना?

भारतीय अंडर 19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका अंडर 19 माहिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 24 वा सामना भारतातील टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत, चाहते येथून सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारतीय अंडर 19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: जी. कमलिनी (यष्टीरक्षक), निकी प्रसाद (कर्णधार), गोंगाडी त्रिशा, सानिका चालके, भाविका अहिरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्हीजे, शबनम मोहम्मद शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा, दृथी केसरी, आनंदिता किशोर, सोनम यादव

श्रीलंका अंडर 19 माहिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: सुमुदु निसानसाला (यष्टीरक्षक), मनुदी नानयक्कारा (कर्णधार), संजना कविंदी, हिरुणी हंसिका, दहमी सानेथमा, रश्मिका सेववंदी, शशिनी गिम्हानी, लिमांसा थिलकरथना, प्रमुदी मेथसारा, असेनी थालुगुणे, चामोदी प्रबोदा, शेहरा इंदुवारी, दानुली थेन्नाकून, विमोक्ष बालसुरिया, रश्मी नेत्रांजली