IND vs SL (Photo Credit - X)

कोलंबो: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्यात टीम इंडियाची (Team India) अत्यंत खराब फलंदाजी पाहायला मिळाली. भारतीय संघाला 50 षटकांत 231 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. इतकंच काय, टीम इंडियाला 14 चेंडूत विजयासाठी फक्त एक धाव करायची होती, पण तेही होऊ शकलं नाही. आता या मालिकेतील दुसरा सामना रविवारी कोलंबोमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. दरम्यान, दुसऱ्या वनडे सामन्यात अनेक मोठे रेकाॅर्डसची नोंद होण्याची शक्यता आहे. (हे देखील वाचा: IND vs SL 2nd ODI Head to Head: भारत आणि श्रीलंका याच्यांत कोणाचे पारडे आहे भारी? जाणून घ्या काय सांगते आकडेवारी)

आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 169 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 99 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. दरम्यान, 2 सामने टाय झाले असून 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. पाहिले तर टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. मागील 6 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने सर्व सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभूत केले आहे. श्रीलंकेने शेवटची वेळ 2021 मध्ये टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकला होता.

उद्याच्या सामन्यात होऊ शकतात हे मोठे विक्रम 

श्रीलंकेचा स्टार फलंदाज चारिथ असालंकाला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 68 धावांची गरज आहे.

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1300 चौकार पूर्ण करण्यासाठी आणखी चार चौकारांची गरज आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 झेल पूर्ण करण्यासाठी आणखी पाच झेलांची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला 27 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 92 धावांची गरज आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 89 धावांची गरज आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला 14,000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 128 धावांची गरज आहे.

श्रीलंकेचा स्टार फलंदाज चारिथ असलंकाला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी सात षटकारांची गरज आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुलला 3,000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 149 धावांची गरज आहे.

श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुसल मेंडिसला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 16 चौकारांची गरज आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 चौकारांचा टप्पा पार करण्यासाठी श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाला आणखी 20 चौकारांची गरज आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज ऋषभ पंतला 100 चौकार पूर्ण करण्यासाठी आणखी 10 चौकारांची गरज आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा स्टार फलंदाज चमिका करुणारत्नेला 500 धावा पूर्ण करण्यासाठी 49 धावांची गरज आहे.