कोलंबो: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुपारी अडीच वाजता हा सामना सुरु होईल. शुक्रवारी दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्यात भारताने श्रीलंका क्रिकेट संघाला केवळ 230 धावांवर रोखले होते. प्रत्युत्तरात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 75 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मानेही स्फोटक अर्धशतक झळकावले, पण असे असतानाही टीम इंडिया केवळ 230 धावांपर्यंतच मर्यादित राहिली. सामना बरोबरीत सुटल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसत होता. आता टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना उद्या खेळावला जाणार आहे. ज्यामध्ये आकडेवारीत कोणाच वरचष्मा आहे ते पाहूया...
आकडेवारीत कोणाचे पारडे जड
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 169 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 99 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. दरम्यान, 2 सामने टाय झाले असून 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. पाहिले तर टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. मागील 6 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने सर्व सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभूत केले आहे. श्रीलंकेने शेवटची वेळ २०२१ मध्ये टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकला होता. (हे देखील वाचा: Virat Kohli New Milestone: फक्त 92 धावा…आणि 'किंग'कोहली रचणार इतिहास, दुसऱ्या वनडेत निशान्यावर असणार रेकाॅर्ड)
कोलंबोमध्ये कसे असेल हवामान?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कोलंबोमध्ये खेळवला जात आहे, ज्याची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रविवारी कोलंबोतील हवामान क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढवत आहे. वास्तविक, 4 ऑगस्ट रोजी कोलंबोमध्ये पावसाची दाट शक्यता आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, रविवारी पाऊस पडण्याची शक्यता 50 ते 82 टक्के आहे. त्याच वेळी, तापमान 30 अंश ते 26 अंशांच्या दरम्यान राहू शकते. ताशी 10 ते 15 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. आर्द्रता 80 ते 88 टक्के राहण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांची अशी असू शकते प्लेईंग-11
भारतीय क्रिकेट संघातील संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रियान पराग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
श्रीलंका क्रिकेट संघातील संभाव्य प्लेइंग 11: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समाराविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियांगे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलेझ, अकिला धनंजय, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.