
India vs Pakistan ICC World Cup 2019: आईसीसी वर्ल्ड कप 2019 च्या सामान्यांसाठी इंग्लड (Engaland) येथे सुरुवात झाली आहे. तसेच भारतीय (India Team) संघाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका (South Africa) संघासोबत खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा 6 गडी राखत विजय मिळवला. मात्र आता क्रिकेट प्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) संघाचा सामना पाहण्याची उत्सुकता लागून राहीली आहे. तर येत्या 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना खेळवण्यात येणार आहे.
तत्पूर्वी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान संघातील खेळाडूंना फक्त खेळावरच लक्ष केंद्रीत करावे अशी सूचना दिली आहे. तसेच खेळाडूंनी जशास तसे करण्याचा प्रयत्न करु नये जेणेकरुन कोणताही वाद निर्माण होईल. त्याचसोबत पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय संघातील खेळाडू बाद झाल्यावर त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी वेगळ्याच प्रकारची मागणी इम्रान खान यांच्याकडे केली होती.
मात्र इम्रान खान यांनी या प्रकारासाठी मनाई केली आहे. त्याचसोबत खेळात कोणतेही बदल करण्यासाठी आईसीसीची परवानगी घ्यावी लागते. परंतु पाकिस्तानने कोणत्याही प्रकारची परवानगी मागितली नसल्याची एका आईसीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत पाकिस्तान खेळाडूंनी उत्साहाच्या भरात कोणतेही कृत्य करु नये ज्यामुळे त्याचा त्रास होईल.
तर यापूर्वी आईसीसी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघावर खेळण्यास बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती. मात्र ही मागणी मान्य करण्यात आलेली नसून भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा सामना खेळवण्यात येणार आहे.