IND vs NZ, ICC WTC Final 2021: भारत विरुद्ध न्युझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यावर पावसाचे संकट, पाहा Pitch Report आणि Weather Report
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (ICC World Test Championship 2021 Final) 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्याची सर्व क्रिकेट विश्वाला प्रचंड उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान, दोन्ही संघांची आणि खेळाडूंची कामगिरी कशी होईल? यासंदर्भात दिग्गज खेळाडूंपासून ते सर्व सामान्य क्रिकेट चाहते अंदाज व्यक्त करत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनला सामना सुरु होण्याअगोदर क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, हवामान विभाग आणि एक्यू वेदर ने दिलेला पावसाचा अंदाज क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पसरवण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना रद्द किंवा अनिर्णित राहिल्यास डब्ल्यूटीसी ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये देण्यात येणार आहे. परंतु, दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. याचदरम्यान, हवामान खात्याने दिलेला अंदाज दोन्ही संघाच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे. साऊथॅम्प्टन येथे 17 आणि 18 जून रोजी 80 टक्के पावसाची पडण्याची शक्यता आहे. दोन दिवस विजेचा कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील ढगाळ वातावरण असेल आणि दीड तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, 18 ते 22 या काळात सामना सुरु असताना अधून मधून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे देखील वाचा- ICC World Test Championship Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट फायनलसाठी भारतीय संघ जाहीर, हे '11' खेळाडू देणार न्यूझीलंडच्या संघाला टक्कर

दरम्यान, रोज बाऊल मैदानात आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 3 सामन्याचा निकाल लागला आहे. तर, 3 सामने ड्रॉ झाले आहेत. या मैदानात गोलंदाजांनी एकूण 161 विकेट्स घेतले आहेत. यात 120 विकेट्स वेगवान गोलंदाजांच्या नावावर आहेत. तर, फिरकीपटूंनी 41 विकेट्स पटकावले आहेत. या मैदानात वेगवाग आणि फिरकी गोलंदाजांनी पाच-पाच वेळा 5 हून अधिक विकेट्स घेतले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आकडेवारी संदर्भात बोलायचे झाले तर, भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारतीय संघाने 21 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाने केवळ 12 सामन्यात भारताला पराभूत केले आहे.