India vs New Zealand 3rd T20I: न्युझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या T20 मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज हेमिल्टनच्या (Hamilton) सेडॉन पार्क (Seddon Park) मैदानावर रंगणार आहे. मागील दोन सामन्यात दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्याने मालिका विजयासाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक जिंकत भारत प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. न्युझीलंड संघावर भारतीय क्रिकेट संघाची 7 विकेट्सने मात, मालिकेत 1-1 अशी बरोबरी
Captain @ImRo45 calls it right at the toss and elects to bowl first in the series decider #NZvIND pic.twitter.com/oknkxbex7J
— BCCI (@BCCI) February 10, 2019
असे असतील दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, शुभमन गिल, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, क्रुणाल पंड्या, खलील अहमद, विजय शंकर, केदार जाधव.
न्युझीलंड: केन विलियम्सन (कर्णधार), कोलिन मुनरो, टिम सेइफेर्ट (विकेटकीपर), रॉस टेलर, कोलिन डी ग्रांडहोम, जेम्स नीशाम, मिशेल सेंटनर, डग ब्रेसवेल, टिम साउदी, ईश सोढी, लॉकी फग्र्यूसन, स्कॉट कुगेलेजिन, डार्ले मिशेल.