विराट कोहली, केन विल्यमसन (Photo Credit: Instagram/BLACKCAPS)

टीम इंडिया (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) उद्या, 29 जानेवारी रोजी हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Sedan Park) मैदानावर तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात आमने-सामने येतील. हा सामना जिंकून भारतीय संघ (Indian Team) मालिका विजय निश्चित करेल, तर किवी संघ आपले मालिकेतील आव्हान कायम ठेवू पाहिलं. ऑकलँडमधील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. या सामन्यादरम्यान प्रत्येकाची नजर हॅमिल्टनच्या हवामानावर लागून आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चांगला सामना अपेक्षित आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी हॅमिल्टनच्या सेडॉन पार्क येथे तिसऱ्या खेळासाठी वातावरण तितकेसे ठीक नाही. आर्द्रता 66% पर्यंत जास्त असेल आणि खेळाच्या कालावधीत विखुरलेल्या सरी पडण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन गेममध्ये हवामानाशी कोणतीही समस्या नव्हती. तथापि, पूर्ण 40 षटकांचा खेळ कोणत्याही व्यत्ययाशिवाय शक्य आहे. (IND vs NZ 3rd T20I: हॅमिल्टन टी-20 सामन्यात विराट कोहली बनणार No 1 कर्णधार, एकाच वेळी मोडू शकतो 'हे' 3 मोठे रेकॉर्डस्)

ऑकलंडमध्ये खेळले गेलेले दोन्ही सामने जिंकल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना 29 जानेवारीला हॅमिल्टनमध्ये खेळला जाईल. उद्या हॅमिल्टनमध्ये वारा 26 किमी प्रतितास वेगाने असेल. शिवाय, जर पाऊस आला तर सामना अगदी छोट्या षटकांसाठीही खेळता येऊ शकतो ज्यामुळे दोन्ही संघांचे चाहते खूप निराश होतील.

दरम्यान, आजवर खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात जिंकलेला भारतीय संघ खूप मजबूत दिसत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कामगिरी न केल्यावरही भारताने विजय मिळविला आहे. श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांनी मधलीफळी मजबूत केली आहे. केएल राहुल याने सातत्यपूर्ण कामगिरी करून स्वत:ला सिद्ध केले. दुसरीकडे, कॉलिन मुनरो न्यूझीलंडकडून लयीत खेळताना दिसला नाही. शेवटच्या सामन्यात केन विल्यमसन आणि मार्टिन गप्टिलची बॅट शांत होती. दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी मात्र शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. भारताचा संघ उद्या जेव्हा मैदानावर येईल तेव्हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करणे हे त्यांचे लक्ष्य असेल, तर न्यूझीलंड संघ मालिका मालिकेत आव्हान कायम ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसणार आहे.